शंत्रुंचा बॅंड वाजवण्याबरोबरच कलेतही पारंगत आहेत भारतीय जवान

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021

पण त्यांच्या या कौशल्याबद्दल आपल्याला माहिती नसते. अशाच एका सैनिकाचा एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात सैन्य दलाच्या एका  शिपायाचे कौशल्य पाहून तूम्ही देखील हैराण व्हाल.

देशाचे रक्षण करण्यासाठी भारतीय सैनिक आपले प्राण गमावतात. देशाच्या संरक्षणासाठी ते काहीही करण्यास तयार असातात. परंतु, आपल्या देशातील सैनिक केवळ देशाच्या संरक्षणासाठी पुढे जात नाहीत, तर ते सांस्कृतीक, कला कौशल्याने कार्यक्रमात देखिल आघाडीवर असतात. त्यांच्यात बरीच प्रतिभा दडलेली असते ते कलाकार असते त्यांच्यात पण कला कौशल्य दडलेली असते. 

पण त्यांच्या या कौशल्याबद्दल आपल्याला माहिती नसते. अशाच एका सैनिकाचा एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात सैन्य दलाच्या एका  शिपायाचे कौशल्य पाहून तूम्ही देखील हैराण व्हाल. लोक त्यांच्या या कलेला भरभरून प्रतिसाद देत आहेत. त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. वास्तविक, या व्हिडिओमध्ये एक जवान छान ड्रम वाजवित आहे.  लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. त्यामुळे सोशल मिडियावर जोरदारपणे या जवानाची स्तूती होत आहे.

पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय -

सोशल मिडियावर हा व्हिडिओ @Maverickmusafir या युजर्सने शेअर केला आहे. या व्हिडिओला "भेटा सैम के. डैनियल ला, जे शानदार आर्मी ड्रमर आहेत. त्यांचा ड्रम वाजविण्याचा अंदाज अनोखा आहे." असे कॅप्शन दिले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 50 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला  आहे. आणि या व्हिडिओला 4 हजाराहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.

संबंधित बातम्या