भारतीय जवानांनी जैश-ए- मोहम्मदच्या कमांडरला घातलं कंठस्नान

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 15 मार्च 2021

 जैश-ए-मोहम्मदचा कंमाडर सज्जाद अफगाणी याचा खात्मा करण्यात भारतीय फौजांना यश आलं आहे.

शोपियान : भारतीय फौजा आणि दहशतवाद्यांमध्ये जम्मू काश्मीरच्या शोपियान भागामध्ये जोरदार धुमचक्री झाली. शोपियानच्या लावलरपोरा गावामध्ये काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर जम्मू काश्मीर पोलिस, भारतीय लष्कर, आणि सीआरपीएफ यांनी संयुक्तपणे दहशतवाद्यांविरोधात मोहीम उघडली. यावेळी झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मदचा कंमाडर सज्जाद अफगाणी याचा खात्मा करण्यात भारतीय फौजांना यश आलं आहे. सज्जाद अफगाणी जैश या दहशतवादी संघटनेसाठी नव्या दमाच्या तरुणांना भरती करुन त्यांना प्रशिक्षण देण्य़ाच्या यंत्रणेत सहभागी असल्याची प्राथमिक माहीती मिळत आहे. भारतीय फौजा आणि दहशतवादी यांच्य़ात अजूनही धुमचक्री सुरु असल्य़ाची माहिती मिळत आहे. अजूनही काही दहशतवादी रावलपोरा गावामध्ये लपून बसल्याची माहीती जम्मू काश्मीर पोलिसांनी देण्यात आली आहे. 

डिलिव्हरी बॉयने बंगळुरुच्या महिलेचे आरोप फेटाळल्यावर झोमॅटोने दिली अधिकृत...

या चकमकीच्या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, दशतवाद्यांच्या विरोधात ही मोहीम शनिवारी संध्याकाळपासून करण्य़ात आली आहे. जम्मू काश्मीर पोलिसांना शोपियान भागातील रावलपोरा गावामध्ये काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती जम्मू काश्मीर पोलिसांना मिळाली होती. परंतु ज्यावेळी दहशतवाद्यांच्या विरोधात प्रत्यक्ष कारवाई करण्याचे पाऊल उचलताच ज्या गावकाऱ्यांनी भारतीय फौजांना माहिती दिली होती, तेच गावकरी दहशवाद्यांसोबत गावातल्या एका घरामध्य़े अडकले असल्याचे भारतीय फौजांना समजलं, तेव्हा काही काळासाठी फौजांना हे ऑपरेशन थांबवलं. त्यानंतर फौजांनी गावकऱ्यांना बाहेर काढल्यानंतरच पुन्हा एकदा फौजांनी दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाई सुरु केली. 

याआधी 11 मार्चला देखील जैश-ए- मोहम्मदच्या दोन कंठस्नान घातलं होतं. हे दोन काश्मीर खोऱ्यातील अंनतनाग जिल्ह्यांमध्ये सापडले होते.

संबंधित बातम्या