भारतीय विद्यार्थी युक्रेनमधून परतले

PTI
बुधवार, 15 जुलै 2020

इंदूरच्या देवी अहिल्यादेवी होळकर आंतरराष्ट्रीय विमानळावर आज पहाटे पाचच्या सुमारास विमान उतरले.

इंदूर

युक्रेनमध्ये शिक्षण घेणाऱ्या १०१ विद्यार्थ्यांना आज एअर इंडियाच्या विशेष विमानाने मायदेशी आणण्यात आले. कोरोना संसर्गामुळे लॉकडाउन लागू केल्याने भारतीय विद्यार्थी बऱ्याच काळापासून युक्रेनमध्ये अडकून पडले होते.
इंदूरच्या देवी अहिल्यादेवी होळकर आंतरराष्ट्रीय विमानळावर आज पहाटे पाचच्या सुमारास विमान उतरले. या विमानातून युक्रेनमध्ये अडकून पडलेले १०१ विद्यार्थी आल्याचे विमानतळाच्या संचालिका अरम्या सान्याल यांनी सांगितले. या विद्यार्थ्यांचे विमानतळावर थर्मल स्क्रिनिंग करण्यात आले. यापैकी एकाही विद्यार्थ्याला बाधा झालेली नसल्याचे निष्पन्न झाले. वैद्यकीय शिक्षणाबरोबरच विविध शिक्षण संस्थेत शिक्षण घेणारे हे विद्यार्थी मध्यप्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, राजस्थान, बिहार, आसाम आणि तमिळनाडू राज्यातील होते. गेल्या तीन महिन्यापासून ते मायदेशी येण्याची वाट पाहत होते. यात सर्वाधिक २० विद्यार्थी इंदूरचे होते. त्यांना सात दिवसांसाठी विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. अन्य विद्यार्थ्यांना त्यांच्या गावी रवाना केल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

संपादन - अवित बगळे

संबंधित बातम्या