वेगात सरकतोय भारतीय भूखंड

.
गुरुवार, 13 ऑगस्ट 2020

सर्वच भूखंडांच्या सरकण्याचा दर सारखाच असल्याचे गृहितक या संशोधनामुळे मोडीत निघाले आहे. भारतीय भूखंड जरी तुलनेने वेगाने सरकत असला तरी त्याचा जिवसृष्टीवर कोणताही परिणाम होणार नाही. -डॉ. श्रीकांत कार्लेकर, भूशास्त्रज्ञ

पुणे:  पृथ्वीवरील इतर भूखंडांच्या तुलनेत भारतीय भूखंड सर्वांत वेगाने उत्तरेकडे सरकत असल्याचे नव्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. तसेच, सर्व भूखंडांच्या सरकण्याचा वेग सारखाच असतो आणि भारतीय भूखंड सरकण्यासाठी लाव्हा उद्रेकातून निर्मित महाराष्ट्रातील दख्खनचे पठार कारणीभूत असल्याची आजवरची धारणा नव्या संशोधनाने मोडीत निघाली आहे.

जिऑलॉजिकल सोसायटी ऑफ अमेरिकेच्या ‘जिओलॉजी’या शोधपत्रिकेत हे संशोधन प्रकाशित झाले आहे. अमेरिकेतील ऑक्‍सफर्ड विद्यापीठ आणि इंग्लंडच्या अल्फ्रेड वॅग्नर इन्स्टिट्यूटच्या शास्त्रज्ञांनी यासंबंधी संशोधन केले आहे. भारत-आफ्रिका, भारत-अटलांटिक, आफ्रिका-दक्षिण अमेरिका, दक्षिण अमेरिका- अटलांटिक आणि मालवियन्स भूखंडांचा अभ्यास शास्त्रज्ञांनी केला. कोट्यवधी वर्षांपासून अतिशय कूर्मगतीने हे सगळे भूखंड सरकत आहेत. विशेष करून भारतीय भूखंडाच्या सरकण्याबद्दल सर्वच भूशास्त्रज्ञांना आकर्षण आहे. नव्या संशोधनातून यावर अधिक प्रकाश पडला आहे. 

नवे बदल:  

  • भारतीय भूखंड सरकण्यासाठी दख्खनच्या पठाराची निर्मिती कारणीभूत नाही
  •  इतरांच्या तुलनेत भारतीय भूखंडाचा सरकण्याचा दर सर्वाधिक
  •  भारत-आफ्रिका, भारत-अटलांटिक या भूखंडातील दरी वाढली तर आफ्रिका-अमेरिका, अमेरिका-अटलांटिका भूखंडांतील दरी कमी होत आहे. 
  • मालवियन्स भूखंड मोठा होत आहे.

भूखंडातील तफावतीचा दर

भारत - आफ्रिका: ११९ टक्के

  • ४.२ ते ९.२ सेंटीमीटर प्रती वर्ष

भारत - अटलांटिक: ७८ टक्के

  • ७.०६ ते १२.५९ सेंटिमीटर प्रति वर्ष

आफ्रिका - दक्षिण अमेरिका: ६० टक्के

  • १.२ ते २.०४ सेंटिमीटर प्रति वर्ष

आफ्रिका - अटलांटिक: ३५ टक्के

  • १ ते १.४८ सेंटिमीटर प्रति वर्ष

दक्षिण अमेरिका - अटलांटिक: ५४ टक्के

  • १.१४ ते १.७५ सेंटिमीटर प्रति वर्ष

 

संबंधित बातम्या