तुम्ही कमी साखर खाता का?; कदाचित साखर संघाच्या अभियानामुळे तुमचं मत बदलेल..

तुम्ही कमी साखर खाता का?; कदाचित साखर संघाच्या अभियानामुळे तुमचं मत बदलेल..
ISMA

नवी दिल्ली- भारतीय साखर कारखाना संघाने ऑनलाईन अभियान सुरू केले आहे. ज्यात ते भारतीयांना साखरेचे महत्व सांगून जास्तीत जास्त साखर खाण्यास ग्राहकांना प्रवृत्त करणार आहेत. खाद्य पदार्थ विभागाचे सचिव सुधांशु पांडे यांनी  भारतीय साखर कारखाना संघाच्या नवीन संकेतस्थळाचे उद्धाटन केले. त्यानंतर ही माहिती देण्यात आली. 

 या संकेतस्थळावरून साखरेबद्दलचे गैरसमज, साखरेचा आरोग्यावर होणारा परिणाम याबद्द्लची मिथके दूर करण्याचा प्रयत्न या संकेतस्थळाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. भारतात साखरेचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. मात्र,  भारतातील साखरेला विदेशात जास्त मागणी असून भारतात त्या तुलनेत लोक साखर खात नसल्याचे चित्र समोर आले आहे.   

भारतातील लोक वर्षाला एकूण १९ किलो साखर खातात. जगातील साखर खाणाऱ्यांच्या तुलनेत ही संख्या कमी आहे. जगात एकूण २३ किलो साखर खाल्ली जाते. त्यामुळे भारतात साखरेला ग्राहक वाढवून देण्यासाठी 'आयएसएमए'ने ही नवीन शक्कल काढली असून याचा किती लाभ संघाला होईल हे बघावे लागेल.       

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com