पुलवामामध्ये भारतीय जवानांची धडक कारवाई; तीन दहशतवाद्यांचा खात्मा

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 2 एप्रिल 2021

भारतीय जवानांनी स्फोटकाद्वारे ही इमारत उडवली.

पुलवामा: पुलवामामध्ये भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सकाळी तीन दहशतवाद्यांचा खत्मा करण्यात भारतीय जवानांना यश आलं आहे. ही चकमक पुलवाममधील काकापोरा भागामध्ये झाली आहे.

दहशतवादी एका तीन मजली इमारतीमध्ये दडून बसले होते. भारतीय जवानांनी स्फोटकाद्वारे ही इमारत उडवली. यामध्ये तीन दहशवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आलं. दहशतवादी आणि भारतीय जवान यांच्यात झालेल्या चकमकीच्या ठिकाणाहून मोठ्याप्रमाणात स्फोटकं आणि शस्त्रसाठा देखील जवानांनी हस्तगत केला आहे. (Indian troops strike in Pulwama The elimination of three terrorists)

NCB ला मोठे यश! दाऊदचा ड्रग्स कारखाना चालवणाऱ्या दानिश ला अटक

तर दुसरीकडे दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या गोळीबारामध्ये दोन नागरीक जखमी झाल्याची माहीती समोर आली आहे. जखमी नागरीकांना तातडीने स्थानिक रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. सध्या त्यांची प्रकृती स्वस्थ असल्याची माहिती मिळाली आहे.

 

संबंधित बातम्या