'15 लाखांसाठी भारतीय सात वर्षापासून वाट पाहतायत;' तुम्हीही थोडी प्रतिक्षा करा

गोमंन्तक वृत्तसेवा
शनिवार, 29 मे 2021

तृणमुल कॉंग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी भाजपला चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे.

बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे यास चक्रीवादळाचा (Yaas Cyclone) मोठा फटका ओडिशा (Odisha) पश्चिम बंगाल (West Bengal) राज्यांना बसला आहे. या चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शुक्रवारी केली. मात्र त्यानंतर झालेल्या आढावा बैठकीवरुन नव्या वादाची ठिणगी पडली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Bannerjee) या आढावा बैठकीत अर्धा तास वेळाने पोहोचल्या. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांची वाट पहावी लागली. त्यानंतर ममता बॅनर्जींना झालेल्या विलंबावरुन भाजप नेत्यांनी ममतांवर टीकेची झोड उठवली. भाजपकडून ममता बॅनर्जी यांच्यावर टीका झाल्यानंतर तृणमुल कॉंग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांनी भाजपला चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे. (Indians have been waiting for Rs 15 lakh for seven years You wait a bit too)

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यास चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर आढावा बैठक घेतली होती. या बैठकीला ममता बॅनर्जी यांनी तीस मिनिटं उशिराने पोहोचल्या. ममतांच्या वर्तुवणूकीवर केंद्र सरकारकडून टीका करण्यात आली. तसेच ममता बॅनर्जी यांनी आढावा बैठकीला येण्यासाठी मुद्दाम उशीर केल्याचा दावा करत भाजप नेत्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. भाजपकडून होत असलेल्या टीकेला तृणमुलच्या लोकसभेतील खासदार महुआ मोईत्रा यांनी उत्तर देत पलटवार केला आहे.  

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डांनी चुकवलं स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव

महुआ मोईत्रा यांनी सोशल मिडियावरील ट्विटरवरुन भाजपवर टीकास्त्र डागले, ''तीस मिनिटं उशीर झाल्याच्या विलंबावरुन एवढा गोंधळ?  भारतीय जनता मागील सात वर्षापासून 15 लाख रुपयांची वाट पाहत आहेत. लोक एटीएमबाहेर तासन् तास वाट बघत आहेत. लसीसाठी अनेक महिन्यापांसून वाट पाहत आहेत. कधी तरी तुम्ही ही थोडी प्रतिक्षा करा,'' असं म्हणत मोईत्रा यांनी केंद्र सरकार आणि भाजपला योग्य प्रत्युत्तर दिले आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला तीन आठवडे उलटत नाहीत, तोच राजकीय संघर्षाची ठिणगी पडली आहे. काही दिवसांपूर्वीच तृणमुलच्या काही मंत्री आणि आमदारांना सीबीआयने अटक केल्यावरुन ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर आगपखड केली होती.

''चक्रीवादळाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राज्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी गैरहजर राहणे हे कृत्य उध्दटपणाचे आणि अविचारी असून मुख्यमंत्र्यांची वर्तवणूक ही शिष्टाचार आणि संघराज्यावरील आघात आहे'' मोदी सरकारने ममता बॅनर्जी यांनी केलेल्या विलंबावरुन म्हटलं होतं. त्यानंतर संरक्षण मंत्री यांनीही ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली होती.

संबंधित बातम्या