बेंगळुरूमधील एरो इंडिया शो मध्ये ड्रोन कॅट्स वॉरियरचे मॉडेल प्रदर्शन

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021

भारताच्या सुरक्षा व्यवस्थापनात आणखी एका लढाउ वॅारियर ड्रोनचा सामावेश होतोय. बंगळुरुमध्ये होणाऱ्या मेगा एअर-शो मध्ये सेमी-स्टेल्थ ड्रोनचे मॉडेल प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

बेंगळुरू:  भारताच्या सुरक्षा व्यवस्थापनात आणखी एका लढाउ वॅारियर ड्रोनचा सामावेश होतोय. बंगळुरुमध्ये होणाऱ्या मेगा एअर-शो मध्ये सेमी-स्टेल्थ ड्रोनचे मॉडेल प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. भारतात सुरक्षा व्यवस्था भक्कम करत असताना वॅारियर ड्रोनची त्यात भर पडली आहे.

वॅारियर ड्रोनचा वापर शत्रूचे हवाई सुरक्षा कवच भेदण्यास सक्षम आहे. भारतीय बनावटीचे तेजस फायटर वॅारियर ड्रोन विकसित करण्यात आले आहे. तेजस लढाउ विमानाचे ,वॅारियर ड्रोन रक्षण करेल त्यासोबत शत्रुवर हल्लाही करण्यास सक्षम आहे, हाच वॅारियर ड्रोन बनवण्या मागचा हेतु आहे. पुढील तीन ते पाच वर्षात वॅारियर ड्रोन हवेत झेपावेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

वैमानिकाच्या जीवाला असणारा धोका कमी करण्याचा ड्रोन निर्मीतीचा उद्देश आहे. वॅारियर ड्रोन चे नियत्रंण तेजस विमानामधुन बसुन करता येणार आहे. हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर लक्षभेदक मारा करण्यास हे सक्षम आहे. स्टेल्थ विमान रडारला चकवा देण्यास सक्षम असते. हे सेमी स्टेल्थ प्रकारातील विमान आहे. त्यामुळे शत्रूच्या रडारला सापडणार नाही. मागच्या पाच वर्षापासून एचएएल काम करत आहे. भारताकडे सध्या असलेल्या ड्रोन विमानांमधून यावर लक्ष ठेवता येणार आहे. परंतु शत्रूवर हवाई हल्ला करु शकणारे हे ड्रोन विमान नाही. म्हणुन एचएएल यांनी काम चालु केले आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

Farmer Protest: शेतकरी आंदोलन बदनाम करण्यासाठीच पोलिसांचा बंदोबस्त -

 

फ्रॅान्स कडुन भारताने 36 राफेल लढाउ विमाने घेतली. विमानाला दोन इंजिने आहेत. याचाही आकार डेल्टा विंग म्हणजे त्रिकोनी पंखाचा आहे. या विमानातही कार्बन धागे आणि इतर साहित्य वापरले जाते. अतिशय वेगवान त्रिमितीय नकाशे या विमानात उपलब्ध होऊ शकतात. तसेच प्रहार झाल्यास त्याचा प्रतिभेद करण्याची क्षमता या विमानात आहे. या विमानाची रडार अतिप्रगत इलेक्ट्रोनिक तंत्रज्ञान लपण्याची क्षमता याचीच किंमत जास्त आहे. या विनमानात हे भरपूर दारूगोळा घेऊन उडू शकण्याची क्षमता आहे.

संबंधित बातम्या