Lt. Gen. Anil Chauhan: देशाचे नवे CDS होणार लेफ्टनंट जनरल अनिल चौहान

New CDS: देशाच्या नवीन CDS च्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
Lt. Gen. Anil Chauhan
Lt. Gen. Anil ChauhanDainik Gomantak

New CDS: देशाच्या नवीन CDS च्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. अनिल चौहान यांची आता नवीन सीडीएस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारत सरकारने लेफ्टनंट जनरल अनिल चौहान (Retired) यांची पुढील CDS म्हणून नियुक्ती केली आहे. ते भारत सरकारच्या लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही काम करतील. लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांची गोरखा रायफलमधून सैन्यात एन्ट्री झाली होती. त्यांनी सुमारे 40 वर्षे देशाच्या सैन्यात सेवा केली, त्यानंतर ते गेल्या वर्षी निवृत्त झाले होते.

हे पद बऱ्याच दिवसांपासून रिक्त होते

माजी CDS जनरल बिपिन रावत (General Bipin Rawat) यांच्या निधनानंतर हे पद रिक्त झाले होते. याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. परंतु नाव ठरवायला सरकारला (Government) खूप वेळ लागला. मात्र आता संरक्षण मंत्रालयाने निर्णय घेतला आहे. माजी CDS बिपिन रावत यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. गेल्या वर्षी 8 डिसेंबरला हा अपघात झाला होता. तेव्हापासून हे पद रिक्त होते.

Lt. Gen. Anil Chauhan
CDS Bipin Rawat Death: सीडीएस बिपिन रावत यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू

निवृत्तीनंतरही देशाची सेवा

निवृत्त लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांनी अंगोलातील संयुक्त राष्ट्र (United Nations) मिशनमध्येही काम केले आहे. गेल्या वर्षी म्हणजे 31 मे 2021 रोजी भारतीय सैन्यातून निवृत्त झाल्यानंतरही त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा आणि धोरणात्मक बाबींमध्ये योगदान दिले. लेफ्टनंट जनरल अनिल चौहान (निवृत्त) यांना लष्करातील त्यांच्या विशिष्ट सेवेबद्दल परम सेवा पदक, उत्तम युद्ध सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, सेना पदक आणि विशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com