President Of Misra
President Of MisraDainik Gomantak

Republic Day: प्रजासत्ताकदिनाला मोदी सरकारकडून 'या' देशाला खास आमंत्रण,आहे ऐतिहासिक संबंध

Republic Day: त्यांच्यातील मैत्रीही खास होती. त्यामुळेच भारत आणि मिस्त्र 1955 मध्ये मैत्री करार झाला होता. त्याचबरोबर अलिप्ततावादाची खांब रोवला गेला होता.

Republic Day: भारत यावर्षी 74 वा प्रजासत्ताक दिवस साजरा करत आहे. भारत सरकार दरवर्षी प्रजासत्ताकदिनी इतर देशांच्या देशप्रमुखांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करत असते. दरवर्षी यामध्ये विविध देशांचा समावेश असतो.

भारता( India )ने यावर्षी मिस्र के राष्ट्रपति अब्देल फतेह अल-सीसी यांना प्रमुख म्हणून आमंत्रित केले आहे. महत्वाची बाब म्हणजे मिस्त्रच्या सेनेचा 12 सदस्यीय बॅंडसुद्धा राजपथावरील पथसंचलनात सहभागी होणार आहे.

भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच मिस्त्रला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवले आहे. दरम्यान, भारत दौऱ्याआधीच मिस्त्रच्या राजदूतांनी भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांचे मोठे कौतुक केले आहे.

मिस्त्रचे तत्कालीन राष्ट्रपती गमाल अब्देल-नासर आणि भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्यातील संबंध अनन्यसाधारण होते.

त्यांच्यातील मैत्रीही खास होती. त्यामुळेच भारत आणि मिस्त्र 1955 मध्ये मैत्री करार झाला होता. त्याचबरोबर अलिप्ततावादाची खांब रोवला गेला होता असे मिस्त्रचे राजदूत अजित गुप्ते यांनी आपल्या विधानात म्हटले आहे.

President Of Misra
Ramcharitmanas Row: रामचरितमानसच नाही तर स्वामी प्रसाद मौर्यांनी 'या' मुद्यावरही तोडले अकलेचे तारे

" जगातील दोन प्राचीन संस्कृती म्हणून, भारत आणि मिस्त्र हे अनेक शतकांपासून जवळचे मित्र आहेत. भारतीय सम्राट अशोकाच्या शिलालेखात टॉलेमी-द्वीतीयच्या कालखंडात या दोन देशांचा संबंध असल्याचा उल्लेख आहे." त्यामुळे, भारत आणि मिस्त्र यांचा ऐतिहासिक कालखंडापासून संबंध आहेत असेही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान ,भारत आणि मिस्त्र यांच्यामध्ये युद्धाअभ्यासाचा सरावदेखील झाला आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये भारत आणि मिस्त्र यांच्या वायूसेनेने( Air-India ) पहिल्यांदा एकत्र येत डेजर्ट वॉरियर हा युद्धअभ्यास केला होता.

दरम्यान, जून 2022 मध्ये भारतीय हवाई दलाच्या तुकडीने महिनाभर चालणाऱ्या लष्करी( Army ) सरावात भाग घेण्यासाठी मिस्त्रचा दौरा केला होता. या लष्करी सरावात भारताचे तीन Su-30 लढाऊ विमानआणि दोन C-17 वाहतूक विमानांनी भाग घेतला होता.

मिस्त्रच्या हवाई दलाने आयोजित केलेला हा पहिलाच कार्यक्रम होता. आता यापुढे भारत आणि मिस्त्र यांच्यातील संबंध कसे असणार आहेत हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com