श्रीनगर विमानतळावर इंडिगो विमानाचे इंजिन कोसळले; सर्व प्रवाशी सुरक्षित

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 13 जानेवारी 2021

श्रीनगरमधील आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडिगो विमानाला अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.

श्रीनगरमधील आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडिगो विमानाला अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. श्रीनगरच्या विमानतळावरील रनवे वर 233 प्रवाशांनी भरलेल्या इंडिगो विमानाचे इंजिन बर्फाला धडकल्याची घटना घडली आहे. मात्र वैमानिकाच्या सावधानतेमुळे एक मोठी दुर्घटना टळली असून, सर्वजण सुरक्षित आहेत. 

आज दुपारी साडेबाराच्या सुमारास श्रीनगरहून दिल्लीकडे जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या 6ई-2559 उड्डाण घेत असताना,विमानाचे एक इंजिन अचानक धावपट्टीवर आदळले आणि धावपट्टीच्या साईडला असणाऱ्या बर्फात जाऊन पडल्याची घटना घडली. व त्यानंतर लगेचच विमानतळावरील अग्निशमन, आपत्कालीन आणि एसडीआरएफच्या सुरक्षा यंत्रणेने अपघातस्थळी धाव घेत सर्व प्रवाशांना विमानातून बाहेर काढले.  

भारतीय हवाई दलाच्या संरक्षण सिद्धतेत होणार मोठी वाढ 

अपघात झालेल्या या विमानात 233 प्रवासी होते. त्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली असून, यातील वैमानिकासह कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती मिळाली आहे.   

संबंधित बातम्या