''देशाचा औद्योगिक विकास खुंटला असून नरेंद्र मोदींची दाढीच वाढते आहे''

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 26 मार्च 2021

एकाबाजूला भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय नेते आणि दुसऱ्या बाजूला तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांच्यात दुहेरी लढत असल्याचे चित्र पश्चिम बंगाल दिसते आहे.

देशातील पश्चिम-बंगाल, केरळ, आसाम, तामिळनाडू आणि केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुदुचेरी राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. यामध्ये विशेषतः पश्चिम बंगालमधील निवडणुकीची देशभरात चर्चा सुरु असल्याचे दिसते आहे. भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. त्यातच आता ममता बॅनर्जी यांनी 'देशाची औद्योगिक क्षेत्रातील प्रगती थांबली असून फक्त नरेंद्र मोदींची दाढी वाढत आहे' असा आरोप केला आहे. (Industrial growth has stopped and only Narendra Modis beard is growing)

 एकाबाजूला भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय नेते आणि दुसऱ्या बाजूला तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांच्यात दुहेरी लढत असल्याचे चित्र पश्चिम बंगाल दिसते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), गृहमंत्री अमित शाह(Amit Shah) तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते पश्चिम बंगालमध्ये प्रचारासाठी सभा घेताना दिसत आहेत. प्रचारादरम्यान ममता बॅनर्जी यांच्यावर नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी टीका केल्याचे पाहायला मिळाले होते. ''देशाची औद्योगिक वाढ थांबली असून, फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दाढी वाढत आहे. कधीकधी ते स्वत: ला स्वामी विवेकानंद म्हणतात, तर कधी स्टेडियमला स्वतःचे नाव देतात. त्यांच्या डोक्यात काही तरी गडबड आहे" अशा शब्दात ममता बॅनर्जी (Mamta Banerjee)  यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. 

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या 294 जागांसाठी 27 मार्च ते 29  एप्रिल दरम्यान आठ टप्प्यांमध्ये निडणूका पार पडणार आहेत. तसेच 2 मे  रोजी या निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. या निवडणुकीच्या प्रचारासाठी भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेस (Trunmul Congress) प्रचंड मेहन  घेताना दिसून येत आहेत. तर पश्चिम बंगालचे मतदार नेमक कुणाला पसंती देतात, हे आता मतपेट्यांमधूनच समजणार आहे.   

लॉकडाऊन नंतर पंतप्रधान मोदी यांचा पहिलाच विदेश दौरा

संबंधित बातम्या