उद्योगपती रतन टाटा म्हणाले, लोकांच्या या भावनेचं कौतुकच पण....

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 6 फेब्रुवारी 2021

भारतातील प्रख्यात उद्योगपतींपैकी एक असणाऱ्या टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा हे सदैव आपल्या सामाजिक कार्यांसाठी समाजमाध्यमात चर्चेत असतात.

नवी दिल्ली: भारतातील प्रख्यात उद्योगपतींपैकी एक असणाऱ्या टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा हे सदैव आपल्या सामाजिक कार्यांसाठी समाजमाध्यमात चर्चेत असतात. मात्र आता रतन टाटा एका वेगळ्याच गोष्टीसाठी चर्चेत आहेत. सोशल मिडीयावर टाटा यांना भारतातील सर्वात मोठा मानला जाणारा नागरी सन्मान 'भारतरत्न' देण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे. मात्र प्रसिध्द उद्योगपती रतन टाटा य़ांनी यावर आपली प्रतिक्रीया दिली आहे,‘’मी लोकांच्या या भावनेचं कौतुक करतो मात्र सोशल मिडीयावर चालत असणाऱ्या या मोहीमा बंद केल्या पाहिजेत’’ असे रतन टाटा यांनी म्हटले आहे. समाजमाध्यमांत टाटा यांना भारतरत्न देण्यात यावा अशी मोठ्यप्रमाणात मागणी करण्यात येत होती. या सगळ्या चर्चेवर टाटांनी ट्वीट च्या माध्यमातून लोकांच्या भावनेचा आदर करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

सेलिब्रेटींच्या ट्विटर वॉरनंतर शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी दिली प्रतिक्रिया

सोशल मिडीया हे लोकांना आपल्या भावना व्यक्त करण्याचं सहज सोपं माध्यम मिळालं आहे.यातूनच आता टाटांना ट्विटरच्या माध्यमातून भारतरत्न देण्याच्या मागणीचा जोर धरला आहे. यावर शुक्रवारी भारतरत्न देण्याचा मुद्दा सर्वाधिक ट्रेडिंगमध्ये होता. तसेच त्यासंबंधी एक विशेष अभियान सुध्दा चालवण्यात आले. ट्विटच्या माध्यमातून टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा म्हणाले, ''समाजमाध्यंमावर एका विशेष गटाकडून एका पुरस्करावरुन व्यक्त करण्यात आलेल्या भावनांचे मी आदर करतो. परंतु मी अत्यंत नम्रपणे आवाहन करतो की, सोशल मिडीयावर चालवण्यात येणाऱ्या मोहिमा बंद कराव्य़ात. मी भारतीय असणे आणि भारताच्या विकासात सदैव योगदान देत आसल्याबद्दल स्व:ला महत भाग्यशाली समजतो.''

संबंधित बातम्या