पेट्रोलच्या पावलावर CNGची धाव; 6 दिवसांत दुसऱ्यांदा CNG चे दर वाढले

देशाची राजधानी दिल्लीत महागाईचा चौफेर फटका बसत आहे.
CNG
CNG Dainik Gomantak

देशभरातील महागाईने होरपळणाऱ्या जनतेचे 'अच्छे दिन'चे स्वप्न सध्यातरी भंग होताना दिसत आहे. देशाची राजधानी दिल्लीत महागाईचा चौफेर फटका बसत आहे. काही दिवसांपूर्वीच वाढलेल्या सीएनजीच्या किमतींमध्ये पुन्हा भडका होत आहे. दिल्लीत सीएनजीच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली आहे. दिल्लीत सीएनजीच्या वाढलेल्या किमती 21 मेपासून लागू होईल. (Inflation hits the masses again CNG prices rose for the second time in 6 days)

CNG
मुख्यमंत्री भगवंत मान यांची मोठी घोषणा, 15 ऑगस्टपासून सुरु होणार मोहल्ला क्लिनिक

दिल्लीत 6 दिवसांत सीएनजीच्या दरात दुसऱ्यांदा वाढ केली आहे. यापूर्वी 15 मे रोजी दिल्ली-एनसीआरमध्ये सीएनजीच्या किमतींत 2 रुपयांनी वाढ केली होती. सध्या दिल्लीत एक किलो सीएनजीसाठी ग्राहकांना 75.61 रुपये मोजावे लागत आहेत.

गुरुग्राममध्ये 83.94 किंमत

दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबाद, नोएडा आणि ग्रेटर नोएडामध्ये सीएनजीच्या दरात 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यानंतर, या शहरांमध्ये प्रति किलो सीएमजीची किंमत आता 78.17 रुपयांवर पोहोचली आहे. याशिवाय गुरुग्राममध्ये राहणाऱ्यांना एक किलो सीएनजीसाठी 83.94 रुपये मोजावे लागणार आहेत.

इतर राज्यात ही दरवाढ

दिल्लीशिवाय रेवाडीत सीएनजीच्या किमतीत वाढ केल्यानंतर आता 86.07 रुपये, कानपूर 87.40 रुपये, अजमेर 85.88 रुपये, कर्नाल 84.27 रुपये, मुझफ्फरनगर 82.84 रुपये प्रति किलो मागे मोजावे लागणार आहेत.

CNG
भारतात ब्लॅकलिस्ट होतोय पाकिस्तानचा 'सोढा राजपूत', विवाह अन् व्हिसा कनेक्शन

सध्या राष्ट्रीय राजधानीत वाहन चालवणे कठीण असल्याचे चित्र आहे. पेट्रोलने केव्हाच 100 रुपयांचा टप्पा ओलांडला आणि त्याचबरोबर सीएनजीही पेट्रोलच्या पावलावर धावताना दिसते आहे. सीएनजी गॅसच्या दरवाढीमुळे सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांच्या भाड्यात सातत्याने वाढ होत असून, त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिश्याला कात्री लागत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com