गूगलवर सर्च केलेली माहिती खरी की खोटी ?  गूगलचे अनोखे फीचर 

दैनिक गोमंतक
सोमवार, 24 मे 2021

गूगलने (Google) ही खोट्या बातम्यांवर (Fake News) आळा घालण्यासाठी नवे फीचर (Feature) लॉच करत आहे. त्यामुळे युजर्स खोट्या बातम्यांना बळी पडणार नाही.

नवी दिल्ली: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान माजवले आहे. त्यात अनेक अफवांचा प्रसार  इंटरनेटच्या (Internet) माध्यमातून वेगाने होत आहे. त्यामुळेच ट्वीटर (twitter), फेसबूक (Facebook) आणि गूगल (google) यासारखे प्लॅटफॉर्म खोट्या बातम्यांवर (Fake News) रोख लावत आहे. ट्वीटरने खोट्या बातम्यांना Manipulated Meadi असा टॅग (Tag) देण सुरू केले आहे. तसेच फेसबूकने (facebook) देखील खोट्या बातम्यांना (Fake News) ट्रॅक करण्याकरिता काही टूल्स दिले आहेत. त्यामुळे गूगलने (Google) ही खोट्या बातम्यांवर (Fake News) आळा घालण्यासाठी नवे फीचर (Feature) लॉच करत आहे. त्यामुळे युजर्स खोट्या बातम्यांना बळी पडणार नाही. (Is the information searched on Google true or false? Google's unique feature)

लसीकरण पथक गावात येताच ग्रामस्थांनी मारल्या नदीत उड्या

गूगलच नवे फीचर - 
गूगलच्या झालेल्या वार्षिक सभेत About this Result या नव्या फीचरची घोषणा केली. हे नवे फीचर गूगलने सर्च केलेल्या गोष्टीच्या सोर्स (Sources) ची  माहिती देणार आहे. तसेच ज्या वेबसाईटची  लिंक आहे. ती लिंक खरच विश्वासार्ह आहे की नाही, याची देखील माहिती युजर्स मिळेल. याकरिता गूगल विकिपीडिया ( Wikipedia) सह काम करत आहे. 

पृ्थ्वीवर लॉकडाउन म्हणून आकाशात लावलं लग्न

नवे फीचर कसे काम करेल-
या फीचरमुळे जेव्हा एखादा युजर गूगलवर कोणतीही माहिती सर्च करेल, त्यावेळी नेहमीसारखेच बरेच वेबसईट्स लिंक दिसतील. त्याच्यानंतर युजरला लिंकच्या बाजूला दिलेल्या तीन डॉट मेन्यूवर क्लिक केल्यानंतर ती वेबसाइट खरच खात्रीशीर आहे की नाही याबद्दल गूगल माहिती देणार. त्यासोबतच वेबसाइटवरील माहिती विकिपीडियावर आहे की नाही याची माहिती देणार आहे. तसेच जी लिंक उघडली आहे ती पेड (Paid) आहे की नाही अशा बाबींची माहिती गूगल देणार आहे. 

युजरला गूगलच्या नव्या फीचरमुळे त्यांनी ओपेन केलेल्या साइटवर किती विश्वास ठेवावा हे समजण्यास आता मदत होणार आहे. गूगळचे हे नवे फीचर अमेरिकेच्या या वर्षीच्या सुरुवातीलाच म्हणजेच फेब्रुवारीला लॉच करण्यात आले होते. तसेच आता 2021 च्या अखेरीस गूगलचे नवे फीचर सर्व युजर्सपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. हे फीचर फक्त इंग्लिश भाषेच्या रिझल्टकारीतच काम करणार आहे.     

 

संबंधित बातम्या