New Parliament: नव्या संसदेचं लोकसभा सभागृह तयार, मोदी सरकार मांडणार अर्थसंकल्प?

Inside Picture Of New Parliament: केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार अर्थसंकल्पीय अधिवेशन नव्या संसदेच्या सभागृहात आयोजित करण्याचा प्रयत्न करत आहे.
LokSabha
LokSabha Dainik Gomantak

Inside Picture Of New Parliament: केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार अर्थसंकल्पीय अधिवेशन नव्या संसदेच्या सभागृहात आयोजित करण्याचा प्रयत्न करत आहे. अर्थसंकल्पाच्या पहिल्या टप्प्याची बैठक 30-31 जानेवारीला बोलावली आहे.

दरम्यान, नवीन संसद (Parliament) भवनाचे दालन तयार आहे. लोकसभा सभागृहातील फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये लोकसभा अतिशय भव्य आणि प्रशस्त दिसत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, नरेंद्र मोदी सरकार या वर्षी संसदेच्या नवीन इमारतीत राष्ट्रपतींचे संयुक्त अभिभाषण करण्याची तयारी करत आहे. यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनही संसदेच्या नवीन सभागृहात मांडले जाण्याची शक्यता आहे.

LokSabha
Supreme Court: सन्मानाने मृत्यू हा सर्वांचा अधिकार- सुप्रीम कोर्ट

तसेच, मोदी सरकार (Modi Government) अर्थसंकल्पीय अधिवेशन नव्या संसदेच्या सभागृहात आयोजित करण्याचा प्रयत्न करत आहे. अर्थसंकल्पाच्या पहिल्या टप्प्याची बैठक 30-31 जानेवारीला बोलावली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपती दोन्ही सभागृहांना संयुक्तपणे संबोधित करतात. दुसऱ्या दिवशी लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला जातो. यावेळी नवीन इमारतीत अर्थसंकल्प सादर होईल, अशी अपेक्षा आहे.

दुसरीकडे, नवीन संसद भवन सध्याच्या संसद भवनापेक्षा मोठे, आकर्षक आणि आधुनिक सुविधांनी सुसज्ज असेल. 64,500 चौरस मीटरमध्ये बांधले जाणारे नवीन संसद भवन बांधण्याचे काम टाटा प्रोजेक्ट करत आहे. संसद भवनाच्या नवीन इमारतीमध्ये दृकश्राव्य प्रणाली तसेच डेटा नेटवर्क सुविधेची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे.

LokSabha
Supreme Court: लायब्ररीत सापडलेल्या पुस्तकासाठी प्राचार्यांना अटक करायची? SC ने MP पोलिसांना फटकारले

याशिवाय, संसदेच्या नवीन इमारतीमध्ये 1,224 खासदार बसण्याची सोय आहे. म्हणजेच एकावेळी 1,224 खासदार बसू शकतात. यामध्ये लोकसभेत 888 तर राज्यसभेत 384 खासदार बसू शकतात. नवीन इमारतीत मध्यवर्ती हॉल असणार नाही. दोन्ही सभागृहांच्या खासदारांना लोकसभेच्या सभागृहातच बसता येणार आहे. नवीन इमारतीत एक सुंदर संविधान कक्षही बांधण्यात आला आहे.

LokSabha
Supreme Court: 'अल्पवयीन मुस्लीम मुलीला लग्नाची परवानगी देणारा पंजाब-हरियाणा HC चा निर्णय...'

विशेष म्हणजे, संसदेच्या नवीन इमारतीत लाउंज, लायब्ररी, कमिटी हॉल, कॅन्टीन आणि पार्किंगची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ही इमारत पूर्णपणे भूकंप प्रतिरोधक आहे, तिचे डिझाइन 'HCP डिझाइन, प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड' ने तयार केले आहे. नवीन चार मजली संसद भवन बांधण्यासाठी 971 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com