हल्ल्यांसाठी दहशतवादी मशिदींचा गैरवापर करतात; पोलीस महानिरीक्षकांनी दिली माहिती

दैनिक गोमंतक
सोमवार, 12 एप्रिल 2021

जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सुरक्षा दल मोठ्या प्रमाणात शोध मोहीम राबवताना पाहायला मिळते आहे. मात्र या कारवाईदरम्यान अतिरेकी मशिदीच्या भिंतींमागे आश्रय घेत गोळीबार करतात आणि पळून जाण्यात यशस्वी होतात, अशी महिती पोलीसांनी दिली आहे.

जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सुरक्षा दल मोठ्या प्रमाणात शोध मोहीम राबवताना पाहायला मिळते आहे. मात्र या कारवाईदरम्यान अतिरेकी मशिदीच्या भिंतींमागे आश्रय घेत गोळीबार करतात आणि पळून जाण्यात यशस्वी होतात, अशी महिती पोलीसांनी दिली आहे. (Inspector General of Police Kashmir Vijay Kumar Said Terrorists misuse mosques for attacks)

स्वदेशी संरक्षण उत्पादनांमध्ये 75 टक्के परदेशी सामग्रीचा वापर

काश्मीरचे पोलिस महानिरीक्षक विजय कुमार यांनी सोमवारी दिलेल्या माहिती नुसार पामपोर, सोपोर आणि शोपियान येथे हल्ल्यांसाठी अतिरेक्यांनी वारंवार मशिदींचा दुरुपयोग केल्याचे निदर्शनास आले आहे. याबद्दलची माहिती देताना आयजीपी विजय कुमार यांनी वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या घटनांचा देखील उल्लेख केला. त्यानुसार दहशतवाद्यांनी 1 जून, 2020 रोजी पामपोरमध्ये , 1 जुलै 2020 रोजी सोपोरेमध्ये आणि  9 एप्रिल, 2021 रोजी शोपियान येथे हल्ल्यांसाठी मशिदींचा दुरुपयोग केला गेल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे मशिदी, सामान्य नागरिक  आणि माध्यमांनी अशा कृत्याचा निषेध केला पाहिजे, असेही त्यांनी पुढे सांगितले. 

दरम्यान, 9 एप्रिल रोजी शोपियान (Shopian) येथे सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एकूण 5 अतिरेकी (Terrorist) ठार झाले असल्याचे समजते आहे. यावेळी दहशतवाद्यांनी  मशिदीच्या (Mosque) आत लपून गोळीबार केला होता.1 जून 2020  रोजी पामपोर चकमकीत तीन अतिरेकी ठार झाले होते, सर्वांनी आश्रय म्हणून जामिया मशिदीत प्रवेश केला होता. 1 जुलै, 2020  रोजी सोपोरमधील मशिदीवर अतिरेक्यांनी केंद्रीय राखीव पोलिस दलावर (CRPF) गोळीबार केल्याने एक सैनिक आणि एक नागरीक ठार झाले आणि तीन कर्मचारी जखमी होते.

संबंधित बातम्या