Instagram Outage: मोठी बातमी! इंस्टाग्राम अकाउंट अचानक होतायेत सस्पेंड

Instagram Suspend: व्हॉट्सअ‍ॅपनंतर आता इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अ‍ॅपमध्येही समस्या निर्माण झाली आहे.
Instagram
Instagram Dainik Gomantak

Instagram Service Closed: व्हॉट्सअ‍ॅपनंतर आता इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अ‍ॅपमध्येही समस्या निर्माण झाली आहे. दरम्यान अचानक खाते सस्पेंड केले जात असल्याचा इशारा देण्यात आला आहे. युजर्स सोशल मीडियावर या अलर्टचा फोटोही शेअर करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, काही युजर्सना दुपारी 1 वाजता हा अलर्ट मिळू लागला होता. तर काही वापरकर्त्यांनी यामागचे कारण म्हणून अ‍ॅपवर एक प्रकारची समस्या असल्याचे मानले, तर अनेकांना ते पाहून आश्चर्य वाटले.

मिळालेल्या माहितीनुसार, युजर्सना अलर्टसह सांगण्यात आले होते की, त्यांच्याकडे 30 दिवस आहेत, त्यानंतर त्यांचे खाते सस्पेंड केले जाईल. हा इशारा हजारो वापरकर्त्यांपर्यंत पोहोचला आहे. मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्यामुळे हे बंद केले जात असल्याचे मानले जात आहे.

Instagram
Instagram Outage: मोठी बातमी! इंस्टाग्राम अकाउंट अचानक होतायेत सस्पेंड

युजर्स नाराज

अशी समस्या मांडल्यानंतरच इंस्टाग्राम युजर्समध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. त्यांनी हा राग त्यांच्या ट्विटर अकाउंटवर काढला, एक-दोन नव्हे तर हजारो यूजर्स आपला राग व्यक्त करत आहेत. काही काळापूर्वी व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) 24 तास बंद असताना युजर्समध्ये प्रचंड संताप होता. आता इन्स्टाग्राममध्येही (Instagram) एवढी मोठी समस्या निर्माण झाल्यानंतर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Instagram
Instagram Reels: Instagram कडून यूजर्ससाठी खास दिवाळी ऑफर, रील बनवून कमवा लाखो रुपये

तसेच, काही युजर्सना अशी समस्या देखील दिसली की, अकाऊंटमध्ये कोणतीही अ‍ॅक्टिव्हिटी होत नाही. मार्गदर्शक तत्त्वांमुळे तुमचे खाते सस्पेंड केले जात आहे. यानंतर इंस्टाग्राम यूजर्स खूप जागरुक झाले आहेत आणि त्यांना त्यांचे अकाउंट सस्पेंड होण्याची भीती वाटत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com