विनाशकाले विपरित बुध्दी; सरकारी रुग्णालयात कोरोना रुग्णावर बलात्कार

गोमंन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 14 मे 2021

बलात्कारानंतर महिलेचा 24 तासामध्येच मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

देशभरात कोरोनाचा संसर्ग (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढू लागला असतानाच कोरोना रुग्णावर सरकारी रुग्णालयात कर्मचाऱ्याकडून बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. बलात्कारानंतर महिलेचा 24 तासामध्येच मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जवळपास एका महिन्यानंतर पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. भोपाळमध्ये (Bhopal) हा धक्कादायक प्रकार घडला आहे. (The intellect contrary to the destroyer Corona patient raped in government hospital)

COVID-19 India: ''कोरोना एक जीव आहे, त्याला जगूद्या''  

6 एप्रिलला भोपाळमधील मेमोरियल हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरमध्ये 43 वर्षीय पिडित महिलेला दाखल करण्यात आलं होतं. भोपाळ पोलिसांनी (Bhopal Police) दिलेल्या माहितीनुसार, पिडित महिलेने डॉक्टरांकडे यासंबंधीची तक्रार करत संबंधित आरोपीची ओळख पटवली होती. यानंतर पिडित महिलेची प्रकृती ढसळली आणि तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्याच संध्याकाळी तिचा दुर्देवी मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून 40 वर्षीय संतोष अहिरवाल (Santosh Ahirwal) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर खटला चालवण्यात येणार असून सध्या त्याला भोपाळ येथील सेंट्रल जेलमध्ये ठेवण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या