International Labour Day: कामगारांची श्रमशक्ती देशाच्या समृद्धीचे प्रतीक

गोमंन्तक वृत्तसेवा
शनिवार, 1 मे 2021

आज जागतिक कामगार दिवस. दरवर्षी 1 मे रोजी संपूर्ण जग आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा करतो. जगात कामगार दिन साजरा करण्याची प्रथा सुमारे 132 वर्ष जुनी आहे. 

आज जागतिक कामगार दिवस. दरवर्षी 1 मे रोजी संपूर्ण जग आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा करतो. जगात कामगार दिन साजरा करण्याची प्रथा सुमारे 132 वर्ष जुनी आहे. जगातील बर्‍याच देशांमध्ये हा आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो. बर्‍याच देशांमध्ये या दिवशी राष्ट्रीय सुट्टीही आयोजित केली जाते. त्याचबरोबर एक मे हा महाराष्ट्र दिन म्हणूनही ओळखला जातो. कारण आज एक मे रोजी संयुक्त महाराष्ट्राची निर्मीती झाली होती.(International Labour Day The labor force of the workers is a symbol of the prosperity of the country)

लसींच्या किंमतीवरून सर्वोच्च न्यायालयानं मोदी सरकारला फटकारलं 

आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या निमित्ताने अनेक नेत्यांनी कामगारांच्या कामगार शक्तीला सलाम केला आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री अमित शहा यांनी ट्विट केले की, 'कामगारांची श्रमशक्ती हे देशाच्या समृद्धीचे प्रतीक आहे. कामगार दिनानिमित्त, कठोर परिश्रम व दृढनिश्चयाने स्वावलंबी भारत घडविण्यात अनन्य भूमिका निभावणार्‍या सर्व कामगारांना मी सलाम करतो.'

गोव्याचे मुख्यंमंत्री प्रमोद सावंत यांनीही कामगारांच्या संघर्षाला सलाम केला आहे. कामगार श्रमिकांच्या कर्तबगारीचे स्मरण केले आहे. काळजी घ्या आणि कोरोनावर मात करण्यास सहकार्य करा, असे आवाहन मुख्यंमंत्री प्रमोद सावंत यांनी कामगारांना केले आहे.

त्याचबरोबर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटरवर लिहिले आहे की, 'राष्ट्र बांधणीत महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या सर्व कामगारांना कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा'.

'ज्यांनी देशाच्या उभारणी व प्रगतीमध्ये निःस्वार्थपणे आपले योगदान दिले आहे अशा सर्व कामगार बांधवांना आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. चला या देशाच्या उत्कर्षासाठी आणि समृद्धीसाठी सदैव तत्पर असणाऱ्या या कामगारांच्या हक्कांचे आणि हिताचे संरक्षण करण्याचा संकल्प करूया, असे ट्विट राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी केले आहे.

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनीही कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कोणत्याही समाजाचा कणा असलेल्या कामगार आणि श्रमिकांचे आभार आणि आदर राष्ट्र नेहमीच तुझ्या ऋणात असणार आहे, असे ट्विट राहून गांधीनी केले आहे.

आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! देशाचे खरे नायक असलेल्या आमच्या कांगारांच्या समर्पणाला सलाम, सुरक्षित रहा!, असे ट्विट केंद्रिय मंत्री श्रीपाद नाइक यांनी  केले आहे.

मुलांमध्ये कोरोनाची सामान्य लक्षणे कशी ओळखावी? 

संबंधित बातम्या