आंतरराष्ट्रीय महिला दिनी एएसआय ने दिले महिलांना खास गिफ्ट: या पर्यटन ठिकाणी मिळणार मोफत प्रवेश

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 6 मार्च 2021

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) ने आंतरराष्ट्रीय महिला दिनी महिलांना एक भेट दिली.

आग्रा: भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) ने आंतरराष्ट्रीय महिला दिनी महिलांना एक भेट दिली. 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनी ताजमहाल, आग्रा किल्ला, फतेहपूर सिक्रीसह सर्व स्मारकात महिला मोफत प्रवेश करू शकतील. एएसआयनेही हा आदेश जारी केला आहे.

काला शुक्रवारी भारतीय पुरातत्व सर्वेक्षणचे सह संयुक्त महासंचालक एम नंबीराजन यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी महिलांच्या मोफत प्रवेशासाठी आदेश जारी केला आहे. गेल्या वर्षी संस्कृती मंत्रालयाने महिलांना मोफत प्रवेश देण्याची सुविधा सुरू केली, जी यावर्षी देखील वाढविण्यात आली आहे. 

मंत्रालयाकडून आदेश प्राप्त झाल्याची माहिती अधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ वसंतकुमार स्वर्णकार यांनी दिली. भारतीय असो वा विदेशी सर्व महिलांना महिला दिनी मोफत प्रवेश दिला जाईल. स्मारकात प्रवेश करण्यासाठी त्यांना तिकीट बुक करण्याची आवश्यकता नाही, असे त्यांनी सांगितले.

या ठीकाणी मिळणार मोफत प्रवेश

10 ते 12 मार्च दरम्यान ताजमहाल येथील मुघल बादशहा शाहजहांच्या 366 व्या उर्सवर पर्यटक विनामूल्य प्रवेश करू शकणार आहे. 10 आणि 11 मार्च नंतर दुपारी 2 नंतर आणि 12 मार्च रोजी सकाळी ते संध्याकाळ पर्यंत पर्यटक विनामूल्य प्रवेश करू शकतील. 

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंगालच्या प्रसिद्ध संदेश मिठाईला देखील चढला राजकिय रंग 

इतकेच नाही तर तळघरात असलेल्या शाहजहां आणि मुमताजची थडगेही तुम्हाला पाहता येतील. यानंतर 18 एप्रिल रोजी जागतिक वारसा दिनी पर्यटक ताजमहालसह सर्व स्मारकांमध्ये विनामूल्य प्रवेश करू शकतील. त्यासाठीसुद्धा एएसआयने शुक्रवारी आदेश जारी केला.

भारत सरकारच्या या निर्णयाचा ग्राहक आणि उत्पादक दोघांनाही होणार फायदा 

1400 मीटर सतरंगी चादर तयार

खुद्दाम-ए-रोजा समितीने ताजमहाल येथे शाहजहांच्या उर्ससाठी 1400 मीटर सतरंगी चादर तयार केली आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे शाहजहांचा उर्स साजरा झाला नव्हता.  एएसआय आणि प्रशासनाने उर्समध्ये सतरंगी चादर देण्यास परवानगी दिली तर चादर करण्यात येईल. परवानगीशिवाय चादरपोशी करणार नाही. संदल, कुरआनख्वानी 11 मार्च रोजी होणार आहे. 12 मार्च रोजी सकाळी चादरपोशी केली जाईल, असे समितीचे अध्यक्ष ताहिरुद्दीन ताहिर म्हणाले.

 

 

संबंधित बातम्या