नीरवच्या पत्नीविरुद्ध इंटरपोलची रेड नोटीस
सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) विनंतीनंतर अॅमीविरोधात रेड नोटीस बजावण्यात आल्याचे इंटरपोलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
नवी दिल्ली: पंजाब नॅशनल बँकेतील गैरव्यवहारप्रकरणातील मुख्य आरोपी नीरव मोदी याची पत्नी अॅमी मोदी हिच्याविरोधात इंटरपोलने आज वैश्विक अटक वॉरंट बजावले. तिच्यावरही आर्थिक हेराफेरीचा ठपका ठेवण्यात आला आहे. सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) विनंतीनंतर अॅमीविरोधात रेड नोटीस बजावण्यात आल्याचे इंटरपोलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या नोटिशीनंतर आता ॲमी मोदीला इंटरपोलचे १९२ सदस्य असणाऱ्या देशांची दारे बंद झाली आहेत.
‘पीएनबी’मधील गैरव्यवहार उघड झाल्यानंतर ॲमीनेही देशाबाहेर पळ काढला होता. आर्थिक हेराफेरीमध्ये नीरवसोबत ॲमीचा देखील सहभाग होता असे ‘ईडी’च्या तपासातून निष्पन्न झाले आहे.सध्या लंडनमध्ये अटकेत असलेल्या नीरवला प्रत्यार्पणाच्या माध्यमातून मायदेशी आणण्याचे भारत सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.
संपादन: ओंकार जोशी