रविश कुमारांना मुलाखत द्या; कुणाल कामराचा मोदींवर निशाणा

रविश कुमारांना मुलाखत द्या; कुणाल कामराचा मोदींवर निशाणा
Interview Ravish Kumar Kunal Kamra targets Modi

प्रसिध्द कॉमोडियन कुणाल कामरा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी 'परिक्षा पे चर्चा 2021' या कार्यक्रमामध्ये विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्याशी दूरचित्र माध्यमाद्वारे संवाद साधला. या कार्यक्रमामध्ये बोलताना मोदींनी, विद्यार्थ्यांनी कठीण प्रश्नाला आगोदर सामोरे जावे असा सल्ला दिला. त्यावरुनच प्रसिध्द कॉमेडियन कुणाल कामराने मोदींच नाव न घेता हल्लाबोल केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘परिक्षा पे चर्चा 2021’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी, पालक, शिक्षकांशी दूरचित्र माध्यमांद्वारे संवाद साधला. यावेळी मोदींनी विद्यार्थ्यांना सांगितलं की, परिक्षा म्हटलं की घाबरुन जाऊ नका, तर स्वत:ला सुधारण्याची एक संधी म्हणून तिच्याकडे पहा. तसेच विद्यार्थ्यांना कठीण प्रश्नांचा आगोदर सामना करावा. ‘’जे आपल्याला आवडते ते आपण आगोदर करावे, विद्यार्थी आवडणाऱ्या विषयांचा जास्त अभ्यास करतात आणि अवघड विषयांकडे दुर्लक्ष करतात. परिक्षेदरम्यान सांगितलं जात की, सोपं आहे ते आधी सोडवून घ्या, मात्र मी तर म्हणने जे कठीण आहे त्याचा आधी निपटारा करायला हवा,’’ (Interview Ravish Kumar Kunal Kamra targets Modi)

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच:च्या जीवनातील काही उदाहरण देताना म्हटले की, माझी सकाळ कठीण निर्णय घेऊन सुरु होते, हाच धागा पकडून कॉमेडियन कुणाल कामराने पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला.

‘’असच असेल तर पुढच्यावेळी अर्णब गोस्वामी याला मुलाखत देण्याऐवजी रविश कुमार यांना मुलाखत देण्याचा प्रयत्न करुन बघावा,’’ अशा आशयाचा ट्विट कामराने केलं आहे. तसेच कुणालने मोदींनी विद्यार्थ्यांना दिलेला सल्ला, कठीण प्रश्न पहिले सोडवावेत असा सल्लाही  पोस्ट केला आहे. पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी यांनी एनडीटीव्हीचे अ‍ॅंकर रविश कुमार यांना एकदाही मुलाखत दिलेली नाही. रविश कुमार यांनी मागील काही काळात मोदींना मुलाखत देण्याचं आव्हान केलं होतं. त्यानंतरही अद्याप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविश कुमारांना मुलाखत दिलेली नाही. परंतु अर्नब गोस्वामीला मुलाखत देतात यावरुनच कुणाल कामराने मोदींवर निशाणा साधला. 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com