मोटार वाहन नियमात प्रस्तावित सुधारणांसाठी सूचना मागवल्या.

Pib
बुधवार, 24 जून 2020

यासंदर्भातील सूचना किंवा प्रतिक्रिया सहसचिव (एमव्हीएल), रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, परिवहन भवन, संसद पथ, नवी दिल्ली -110001 (ईमेल: jspb-morth@gov.in) वर 18 जुलै 2020 पर्यंत पाठवता येतील.

मुंबई, 

बांधकाम साहित्य वाहून नेणारी वाहने, ट्रॅक्टर आणि कापणी यंत्रांसाठी भारत स्टेज चतुर्थ उत्सर्जन निकषांची अंमलबजावणी विलंबाने करण्यासाठी मोटार वाहन नियमात प्रस्तावित सुधारणांसाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सर्व भागधारक तसेच जनतेकडून सूचना, प्रतिक्रीया मागवल्या आहेत. यासंदर्भातील अधिसूचना 19 जून रोजी तात्काळ प्रभावाने जारी करण्यात आली आहे, ती www.morth.gov.in.या संकेतस्थळावर पाहता येईल.

कोविड -19 ची परिस्थिती लक्षात घेता कृषी मंत्रालय व बांधकाम उपकरणे उत्पादकांकडून विनंती केली गेली आहे की 1 ऑक्टोबरपासून लागू होणाऱ्या उत्सर्जन नियमांच्या पुढील टप्प्यातील अंमलबजावणीसाठी काही वेळ द्यावा. या विनंतीनुसार मंत्रालयाने 19 जून 2020 रोजी जीएसआर 393 (ई) ची प्रारूप अधिसूचना जारी केली आहे. या विनंतीचा विचार करून मंत्रालयाने भारत स्टेज (सीईव्ही / टीआरईएम) चतुर्थ उत्सर्जन निकषांबाबत 1 ऑक्टोबर 2020 ते 1 ऑक्टोबर 2020 या कालावधीत हितसंबंधीतांकडून सूचना मागवल्या आहेत.

 

संबंधित बातम्या