IPL 2021:आयपीएलच्या आयोजनावरुन पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा BCCI ला सवाल

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 9 मार्च 2021

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी आयपीएलच्या वेळापत्रकं आणि शहरांच्या निवडीवरुन बीसीसीआयला अनेक प्रश्न विचारले आहेत.

चंदीगड: इंडियन प्रिमिअर लीगचा 14 व्या हंगामाची सुरुवात 9 एप्रिल ते 30 मे या कालावधीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह देशातील सहा शहरांमध्ये होणार आहे. परंतु आयएपील स्पर्धेतील काही सामने प्रेक्षकांविना खेळवले जाणार आहेत. देशातील सहा शहरांमध्ये आयपीएलचे सामने खेळवले जाणार आहेत. मात्र पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी आयपीएलच्या वेळापत्रकं आणि शहरांच्या निवडीवरुन बीसीसीआयला अनेक प्रश्न विचारले आहेत.

अहमदाबाद, बेंगळूर, चेन्नई, दिल्ली, कोलकातासह मुंबई या शहरांमध्ये आयपीएलच्या हंगामातील सामने खेळवले जाणार आहेत. परंतु याच शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढत आहेत. या शहरांमध्ये मुंबईचाही समावेश आहे. आणि याच मुद्द्यावरुन पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी बीसीसीआयला पत्र पाठवलं आहे. आयपीएलचे सामने खेळवण्यात येणाऱ्या शहरांमध्ये मोहाली शहराचा समावेश नसल्यामुळे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

''दिवसाला 9 हजाराहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळून येत असतानाही आयपीएलचे सामने खेळवू शकता, तर मग मोहालीमध्ये आयपीएलचे सामने खेळवण्यामध्ये काय अडचण आहे? आम्ही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ते खबरदारी घेऊ,'' असं मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

भाजपमध्ये सिंधिया बॅकबेंचर, कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाही"

कोलकाता शहराचा सामने खेळवण्य़ामधील शहरांच्या यादीमध्ये समावेश केला असला तरी बीसीसीआयने 6 मे पर्यंतच्या पहिल्या चार आठवड्यातील 33 सामन्यापैकी एकही सामना कोलकातामध्ये आयोजीत केला जाणार नाही. आगामी काळात पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूका होणार असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. गतवर्षी आयपीएलचा हंगाम उशीराने संयुक्त अरब अमिरातीमध्य़े सरु झाला होता. यात मुंबई इंडियन्सने आयपीएलचे जेतेपद जिंकले होते. आता 14 व्या आयपीएलच्य़ा हंगामातील सामने भारतातच खेळवण्यात येत आहेत. 

 

संबंधित बातम्या