
ISC Result 2022 Declared: कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (CISCE) ने आज (ISC) बारावीचा निकाल जाहीर केला आहे. अधिकृत साइट cisce.org वर जाऊन विद्यार्थी निकाल पाहू शकतात.
दरम्यान, परीक्षेचा (Exam) निकाल पाहण्यासाठी विद्यार्थी एसएमएसचाही वापर करु शकतात. यासाठी युनिक आयडी टाईप करुन 1234567, 09248082883 या क्रमांकावर विद्यार्थी एसएमएसद्वारे ISC निकाल पाहू शकतात.
निकाल पाहा
स्टेप 1: सर्व प्रथम विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाइट results.cisce.org आणि cisce.org ला भेट द्यावी.
स्टेप 2: त्यानंतर त्यांनी लिंकवर क्लिक करावे आणि ISC रिझल्ट लिंक ओपन करावी.
स्टेप 3: यानंतर विद्यार्थी त्यांचा युनिक आयडी, इंडेक्स नंबर आणि इतर आवश्यक माहिती टाकतात.
स्टेप 4: आता विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
स्टेप 5: यानंतर विद्यार्थी त्यांचे निकाल पत्र डाउनलोड करु शकतात.
स्टेप 6: शेवटी, विद्यार्थ्यांनी निकालाची हार्ड कॉपी काढावी.
ICSE 10 वी चा निकाल जाहीर झाला
CISCE ने 17 जुलै रोजी ICSE इयत्ता 10वीचा निकाल जाहीर केला होता. त्याचवेळी निकाल जाहीर होण्याच्या एक दिवस अगोदर बोर्डाने निकालाची तारीख आणि वेळेची माहिती दिली होती. यंदा 99.97 टक्के विद्यार्थी (Students) दहावीत उत्तीर्ण झाले आहेत. मुलींनी (Girls) पुन्हा एकदा बाजी मारली आहे. यामध्ये 99.98% मुली आणि 99.97% मुले उत्तीर्ण झाली. ICSE 10 वीचा निकाल 2022 17 जुलै 2022 रोजी रविवारी संध्याकाळी 5 वाजता जाहीर करण्यात आला होता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.