'इस्राईल'ची जगातील सर्वात शक्तीशाली गुप्तहेर संस्था करणार दिल्ली स्फोटाची चौकशी

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 31 जानेवारी 2021

इस्त्रायली दूतावासाबाहेर झालेल्या या स्फोटाच्या चौकशीसाठी इस्रायली गुप्तहेर संस्था 'मोसाद' दिल्ली पोलिसांच्या मदतीला येण्याची शक्याता आहे.

दिल्ली :  शुक्रवारी राजधानी दिल्लीतील अब्दुल कलाम रोडवरील इस्त्रायली दूतावासाबाहेर मोठा स्फोट झाला,यात सुदैवाने जीवितहानी झाली नसून,  तीन वाहनांचे नुकसान झाले आहे. ज्या ठिकाणी स्फोट झाला, ते ठिकाणी विजय चौकापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर आहे. घटनेच्या वेळी विजय चौक येथे 'बीटिंग रिट्रीट' सोहळा चालू होता, ज्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

इस्त्रायली दूतावासाबाहेर झालेल्या या स्फोटाच्या चौकशीसाठी इस्रायली गुप्तहेर संस्था 'मोसाद' दिल्ली पोलिसांच्या मदतीला येण्याची शक्याता आहे. हा स्फोट इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड कोअर व त्यांच्या  कुड्स फोर्सनी घडवून आणल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. दिल्ली पोलिसांची विशेष पथके आणि गुप्तहेर संस्था या प्रकरणाचा तपास करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्राईलची तपास यंत्रणा मोसाद ही भारतीय यंत्रणांना या तपासात सहकार्य करणार आहे.

इस्रायली गुप्तहेर संस्था 'मोसाद' ही जगातील सर्वात प्राणघातक गुप्तचर यंत्रणा समजली जाते, हे त्यांनी अनेक वेळा सिद्धदेखील केलं आहे. 1972 मध्ये म्यूनिच ऑलिम्पिकमध्ये जेव्हा दहशतवाद्यांनी 11 इस्त्रायली खेळाडूंना ठार मारले तेव्हा मोसादने 20 वर्षांचे ऑपरेशन चालवून एका दहशतवाद्याची हत्या केली होती. वास्तविकत:,एकदा आरोपी मोसादच्या नजरेत आला, त्यातून त्याची सुटका अशक्य आहे. जगातील कोणत्याही कोपऱ्यातून त्याचा शोध घेण्याची ताकद मोसादच्या एजंट्सकडे आहे. हेच कारण आहे की, इस्त्रायली या गुप्तहेर संस्थेला जगातील सर्वात धोकादायक एजन्सी म्हटले जाते.

इस्राईल किंवा तेथील नागरिकांविरूद्ध जिथे कुठे षडयंत्र रचले जाते, अशा प्रत्येक ठिकाणी मोसाद पोहोचते. मोसादचा इतिहास 63 वर्षे जुना आहे. त्याचे मुख्यालय इस्राईलच्या तेल अवीव शहरात आहे. सन 2021 मध्ये जेव्हा भारतातील दिल्लीस्थित इस्रायली दूतावासाच्या गाडीवर हल्ला झाला होता, तेव्हा मोसाद या तपासात सामील झाली होती. या हल्ल्यामागे इराणच्या रेव्होल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्स आणि कुड्स फोर्सचा हात असल्याचे मोसादच्या तपासणीनंतरच उघड झाले होते.   

संबंधित बातम्या