इस्त्रायल दुतावास स्फोट: परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची इस्त्रायलच्या विदेश मंत्र्यांशी चर्चा

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 30 जानेवारी 2021

"इस्त्रायली दूतावासाबाहेर झालेल्या स्फोटांबद्दल नुकतेच इस्त्रायली एफएम गाबी अश्केनाझी यांच्याशी बोलणे झाले. आम्ही हे प्रकरण अतिशय गांभीर्याने घेत आहोत.

नवी दिल्ली:  परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी शुक्रवारी इस्रायलचे परराष्ट्रमंत्री गाबी अश्केनाझी यांच्याशी संवाद साधला आणि त्यांना आश्वासन दिले की दिल्लीतील इस्राईली दूतावासाच्या बाहेर स्फोट झाल्यावर कर्मचारी आणि मुत्सद्दी लोकांना संरक्षण पुरवले जाईल. ते म्हणाले की, भारत या प्रकरणाची गंभीरपणे दखल घेत आहे आणि त्याबाबत चौकशी सुरू आहे. 

"इस्त्रायली दूतावासाबाहेर झालेल्या स्फोटांबद्दल नुकतेच इस्त्रायली एफएम गाबी अश्केनाझी यांच्याशी बोलणे झाले. आम्ही हे प्रकरण अतिशय गांभीर्याने घेत आहोत. दूतावास आणि इस्त्रायली मुत्सद्दी लोकांना त्यांचे पूर्ण संरक्षण देण्याचे आश्वासन आम्ही आपल्याला देत आहोत. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि दोषींना शोधण्यात कोणतीही कसर सोडली जाणार नाही," असे   यांनी ट्विट परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी केले आहे.

सायंकाळी 5. 45 वाजताच्या सुमारास राष्ट्रीय राजधानी दिल्लीच्या लुटियंस भागात एपीजे अब्दुल कलाम रोडवर इस्त्राईली दुतावासाबाहेर  झालेल्या या स्फोटामुळे परिसरातील तीन मोटारींचे विंडस्क्रीन फुटले. दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, कुठल्याही प्रकारची जीवित हानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाले नाही. "एपीजे अब्दुल कलाम रोड, जिंदाल हाऊसजवळ सायंकाळी 5. 45 वाजता अत्यंत कमी-तीव्रतेचे इंस्ट्रूव्हिज्ड उपकरणं तेथे निघाले. जवळपास उभ्या असलेल्या तीन वाहनांच्या खिडकीच्या काचा फुटल्या त्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला इजा किंवा कोणत्याही मालमत्तेचे नुकसान झाले नाही. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली होती.

हा बॉम्बस्फोट झाल्यामुळे गंभीर वातावरण निर्माण झाले आहे. स्फोट झाल्याच्या ठिकाणी एक चिठ्ठी सापडली असल्याची माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.  त्या चिठ्ठीवर इस्त्राईली दुतावासाचा पत्ता लिहिल्याचे दिसून आले आहे. याबाबत अधिक माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. यासोबतच घटनास्थळावर काही बॉल बेअरिंग प्राप्त झाले आहे, ज्याचा वापर बॉम्ब तयार करण्यासाठी केला जातो.

तिरेंगे का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान’ सिंघू बॉर्डरवरील वातावरण तापलं -

 

 "भारतीय एफएमने मला आश्वासन दिले की भारतीय अधिकारी सर्व इस्त्रायली मुत्सद्दी कर्मचार्‍यांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध आहेत आणि स्फोटात सामील असलेल्या सर्वांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे," असे म्हणत अश्कनाजी यांनीही इस्त्राईलच्या बाजूने पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले आहे.

ओवीसींना बिहारमध्ये झटका? -

दिल्ली विशेष पोलिस पथक, गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी आणि गुप्तचर विभागाचे अधिकारी काल घटनास्थळी पोहचले. दरम्यान दिल्लीतील इस्त्राईल दूतावासातील एका कारवर 13 फेब्रुवारी 2012 रोजी बॉम्ब हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात इस्त्रायलचे राजन्यायिक अधिकारी ताल येहोशुआण आणि चालक यांच्यासह आणखी चार जण गंभीर जखमी झाले होते. त्यावेळी झालेल्या चौकशीत या प्रकरणातील एका आरोपीला अटकही झाली होती. 
 

संबंधित बातम्या