भारताने 'ईओएस-०१'चे केले यशस्वी लॉन्चिंग

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 7 नोव्हेंबर 2020

ताज्या माहितीनुसार ईओए- ०१ यशस्वीरित्या पीएसएलव्ही-सी ४९च्या चौथ्या टप्प्यातून वेगळे होऊन ऑर्बिटमध्येमध्ये पोहोचले आहे. अन्य नऊ विदेशी कस्टमर सॅटेलाईट सुद्धा वेगळे होऊन आपल्या निर्धारित ऑर्बिटमध्ये पोहोचले आहे.

श्रीहरिकोटा - इस्रोने आज पृथ्वीच्या निरीक्षणासाठी उपग्रह ईओएस-०१ चे यशस्वी उड्डाण केले आहे. निश्चित समयापेक्षा 10 मिनिट उशिराने म्हणजे 3 वाजून 12 मिनिटांनी हे उड्डाण केले गेले.  या उपग्रहाबरोबर 9 कस्टमर सॅटेलाईट्सही सोडण्यात आले.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या यशस्वी चाचणीचे कौतूक करून इस्त्रोला शुभेच्छा दिल्या. त्यांनी शुभेच्छा देताना ट्वीट करत म्हटले की, ‘मी इस्त्रो आणि भारतातील अंतराळ उद्योगाला पीएसएलवी-सी ४९/ईओएस-01 अभियानाच्या यशस्वी लॉन्चिंग साठछी शुभेच्छा देतो. आमच्य वैज्ञानिकांनी हे आव्हानाची निर्धारीत वेळ गाठण्यासाठी कितीतरी संकटांना पार केले आहे.’ 

 या उपग्रहांना श्रीहरिकोटा स्थित सतीश धवन अंतराळ केंद्रात भारतीय उपग्रह प्रक्षेपण यान पीएसएलवी-सी49 पासून या ५१व्या अभियानात प्रक्षेपित केले गेले. लॉन्चिंगची उलटी गणती सुरू करताना इस्त्रोने काल या उपग्रहाचा कृषी, वन्यजीव आणि आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात उपयोग होणार असल्याचे सांगितले.  

ताज्या माहितीनुसार ईओए- ०१ यशस्वीरित्या पीएसएलव्ही-सी ४९च्या चौथ्या टप्प्यातून वेगळे होऊन ऑर्बिटमध्येमध्ये पोहोचले आहे. अन्य नऊ विदेशी कस्टमर सॅटेलाईट सुद्धा वेगळे होऊन आपल्या निर्धारित ऑर्बिटमध्ये पोहोचले आहे.पीएसएलव्ही-सी४९/ईओएस- ०१ अभियानाचे काउंटडाउन शुक्रवारी दुपारी एक वाजून २ मिनिटांनी झाले होते.    

 

संबंधित बातम्या