अंतराळात फडकणार तिरंगा, 750 विद्यार्थिनींनी बनवलेला 'आझादीसॅट' इस्रो करणार लॉन्च

ISRO: आता इस्रो हे आश्वासन पूर्ण करणार आहे.
Rocket
RocketDainik Gomantak

Azadisat: चार वर्षांपूर्वी स्वातंत्र्यदिनानिमित्त खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त अवकाशात तिरंगा फडकवणार असल्याचे सांगितले होते. आता इस्रो हे आश्वासन पूर्ण करणार आहे. 7 ऑगस्ट रोजी, भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आतापर्यंतच्या सर्वात लहान व्यावसायिक रॉकेटसह 'आझादीसॅट' उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. हे रॉकेट तिरंगा सोबत घेऊन आकाशात उडेल.

पंतप्रधानांचे आश्वासन काय होते?

गगनयान मोहिमेद्वारे राष्ट्रध्वज अवकाशात पाठवला जाईल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते. या मोहिमेत मानवही अंतराळात जाणार आहे. मोहिमेला उशीर झाल्यामुळे हे आश्वासन पूर्ण झाले नसले तरी या निमित्ताने इस्रो (ISRO) विशेष प्रयोग करत आहे, जो भविष्यासाठी खूप उपयुक्त ठरु शकतो. लहान उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी इस्रोने स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल (SSLV) विकसित केले आहे. याच्या मदतीने 500 किलोपर्यंतचे वजन पृथ्वीच्या कक्षेत ठेवता येईल.

Rocket
इस्रो शास्त्रज्ञाच्या पत्नीनेच रचला 25 लाख लुटण्याचा कट, काय आहे प्रकरण

ग्रामीण विद्यार्थिनींनी बनवलेला उपग्रह

'आझादी का अमृत महोत्सवा'च्या निमित्ताने एसएसएलव्ही ज्या सहप्रवाशासोबत अंतराळात जाणार आहे, त्याची स्वतःची खासियत आहे. त्याचे नाव 'आझादीसॅट' असे असून ते 750 ग्रामीण विद्यार्थिनींनी (Student) बनवले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना संशोधन आणि विज्ञानाकडे प्रवृत्त करण्यासाठी हा प्रकल्प राबविण्यात आला होता. या प्रकल्पातर्गंत विद्यार्थिनींनी मिळून एक छोटा उपग्रह तयार केला.

हा प्रयोग भविष्यासाठी कितपत उपयुक्त ठरेल

भविष्यात अंतराळ कार्यक्रमासाठी ही मोहीम अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. या 120-टन SSLV सह, 500 किलोपर्यंतचे वजन सहजपणे पृथ्वीच्या कक्षेत पाठवले जाऊ शकते. हे खूप किफायतशीर आहे. इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ म्हणाले, 'हा नवीन उपग्रह गेम चेंजर ठरु शकतो.'

Rocket
Alert! 348 मोबाईल अ‍ॅप्सवर केंद्र सरकारने घातली बंदी, चीन पाठवत होता डेटा

ते पुढे म्हणाले की, 'याच्या यशामुळे भविष्यात भारत एक मोठी उपग्रह प्रक्षेपण बाजारपेठ बनू शकेल. कमी वेळेत आणि कमी खर्चात मोठ्या उपग्रहाप्रमाणे काम भारत सहजपणे करु शकतो. याद्वारे अनेक देश आपले उपग्रह तयार करुन प्रक्षेपित करण्यासाठी भारताची मदत घेऊ शकतात. यामुळे अवकाश क्षेत्रातही भारताचा दबदबा वाढणार असून अनेक कंपन्या छोट्या उपग्रहांसाठी भारतात येऊ शकतात.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com