सोशल मिडियावरुन वाढदिवसाच्या शुभेच्छा देणं वकिलाला पडलं महाग; जाणून घ्या कारण

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 3 मार्च 2021

ईमेलच्या माध्यमातून वकिलाने महिला न्यायाधीशांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

रतलाम : महिला न्यायाधीशांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणं मध्यप्रदेशातील वकिलाला   चांगलंच महागात पडलं आहे. वकिलाची थेट तुरुंगात रवानगी करण्यात आली. मात्र वकिलाने जामीन मिळावा यासाठी उच्च न्यायालय़ात याचिका दाखल केली आहे. ईमेलच्या माध्यमातून वकिलाने महिला न्यायाधीशांना वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवल्या होत्या. वकिलाने महिला न्यायाधीशांच्या फेसबुक आकाउंटवरुन त्यांचे फोटो डाऊनलोड केले होते. त्यानंतर न्य़ायाधीशांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी वकिलाला अटक केली.

मध्यप्रदेशातील रतलाम पोलिसांनी 9 फेब्रुवारीला वकिल विजयसिंग यादव यांना न्यायदंडाधिकारी मिथाली पाठक यांना 29 जानेवारीला ईमेल आणि वाढदिवसाचं कार्ड पाठवलं होत. तसेच न्यायमूर्ती मिथाली पाठक यांचा फोटो फेसबुकवरुन  डाउनलोड करुन वाढदिवसाच्या कार्डसोबत जोडल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला आहे.

बंगाल निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला लागलं ग्रहण; पक्षांतर्गत खडाजंगी बाहेर

तक्रारीमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, वकिल विजयसिंग यादव यांनी न्यायाधीश मिथाली पाठक यांचा फोटो परवानगी न घेता वापरला आणि त्यांना त्यांच्या अधिकृत खात्यावरुन ईमेल पाठवला होता. वकिल विजयसिंग यादव न्य़ायाधीशांच्या अधिकृत फेसबुक मित्रांच्या यादीत नसल्याने त्य़ांच्यावर अनधिकृतपणे फोटोचा वापर केल्यामुळे त्य़ांच्यावर आयटी कायद्यांतर्गत कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तर दुसरीकडे विजयसिंग यांच्या कुटुंबाने त्यांना जामीन मिळण्यासाठी अर्जही केला होता. मात्र त्यांचा हा अर्ज फेटाळून लावण्यात आला होता. यामुळे नंतर विजयसिंग यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यादव यांनी आवश्यक गुन्हे दाखल करण्यात आले असं म्हटलं आहे. मात्र आपला न्यायाधीशांच्या प्रतिमेला कोणत्याही प्रकारचा धक्का लावण्याचा आपला प्रयत्न नसल्य़ाचे त्यांनी सांगितले आहे. तसेच आपणाला सोशल मिडियाची आणि इंटरनेटची जास्त माहिती नसल्याचे म्हटले आहे.
 

संबंधित बातम्या