१९ वर्षांपूर्वी आजच्या दिवशी भारतीय लोकशाहीचं मंदिर होतं धोक्यात ; संसदेवरील हल्ल्याला १९ वर्षं पूर्ण

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 13 डिसेंबर 2020

१ डिसेंबर २००१ रोजी लोकसभेचे अधिवेशन सुरू असताना लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद च्या पाच दहशतवाद्यांनी भारतीय संसदेवर हल्ला केला.

नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज १९ वर्षांपूर्वी दहशतवाद्यांविरूद्ध भारतीय संसदेचे रक्षण करताना प्राण गमावलेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली. २००१ साली आजच्या दिवशी आमच्या संसदेवर झालेला भ्याड हल्ला आम्ही कधीही विसरणार नाही अशा भावना पंतप्रधानांनी ट्विटरद्वारे व्यक्त केल्या. ते पुढे म्हणाले, संसदेचे रक्षण करणारे प्राण गमावलेल्यांचे शौर्य आणि त्यागाची आठवण आंम्हाला आहे, भारत नेहमीच त्यांचा ऋणी राहील.

 

१ डिसेंबर २००१ रोजी लोकसभेचे अधिवेशन सुरू असताना लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद च्या पाच दहशतवाद्यांनी भारतीय संसदेवर हल्ला केला. हल्ल्याच्या वेळी सभागृह तहकूब करण्यात आलं होतं, परंतु इमारतीच्या आत अनेक खासदार आणि कर्मचारी उपस्थित होते. केंद्रीय गृहराज्यमंत्री अमित शहा यांनी 'लोकशाहीचे मंदिर संसद, रक्षण करण्यासाठी आपला जीव गमावलेल्या लोकांना आम्ही सलाम करतो, असं लिहीत शहिद झालेल्यांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली. दिल्ली पोलिसांचे पाच सुरक्षा कर्मचारी, सीआरपीएफच्या एक महिला कॉन्स्टेबल आणि संसद भवनातील दोन सुरक्षा सहाय्यकांचा संसद भवनामध्ये दहशतवाद्यांना रोखताना मृत्यू झाला होता. एक माळी आणि एका फोटो पत्रकारानेही आपले प्राण गमावले.

 

या हल्ल्यात सामील झालेले पाचही दहशतवादी १३ डिसेंबर रोजीच सुरक्षा कर्मचार्‍यांशी झालेल्या गोळीबारात ठार झाले होते, परंतु या हल्ल्याचे सुत्रधार असलेले मोहम्मद अफझल गुरू, शौकत हुसेन, अफसान गुरू आणि एसएआर गिलानी यांच्याविरूद्ध खटला चालू होता. सर्वोच्च न्यायालयाने अखेर दोघांना निर्दोष सोडले आणि अफझल गुरूला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली.

संबंधित बातम्या