दोन ते तीन महिन्यात संपूर्ण देशाचं लसीकरण होण अशक्य- अदर पूनावाला

गोमंन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 18 मे 2021

जगभरात आलेलं कोरोनारुपी संकट मोठं आहे.

देशात कोरोनाचा संसर्ग (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढू लागला असताना लसींची कमरता जाणवत आहे. त्यामुळे विरोधकांनी मोदी सरकारला धारेवर धरलं आहे. देशातील कोरोना लसी जगभरातील इतर देशांना का दिल्या याबाबत सोशल मिडियावर रान उठवलं आहे. त्यातच सीरम इन्स्टीट्यूटचे (Serum Institute India) कार्यकारी प्रमुख अदर पूनावाला (Adar Poonawala) यांनी सोशल मिडियावर एक पत्रक पोस्ट केले आहे. भारतीयांच्या वाट्याच्या कोरोना लसी निर्यात केल्या नाहीत असं स्पष्टीकरण अदर पूनावाला यांनी दिलं आहे. तसेच दोन-तीन महिन्यामध्ये संपूर्ण देशाचं लसीकरण शक्य नसल्याचा उल्लेख या पत्रकात करण्यात आला आहे. (It is impossible to vaccinate the whole country in two to three months  Adar Poonawala)

जगभरात आलेलं कोरोनारुपी संकट मोठं आहे. त्यामुळे हे संकट रोखण्यासाठी लसी खूप मोठं हत्यार आहे. मात्र लस निर्मिती करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे संपूर्ण जगाचे लसीकरण होण्यासाठी 2 ते 3 वर्षाचा कालावधी लागेल असंही त्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

COVID-19 Vaccination: ''गावाचं 100 टक्के लसीकरण करा आणि मिळवा 10 लाख...

'2021 पासून देशात लसीकरणाची मोहीम सुरु झाली. त्यामध्ये सर्वप्रथम फ्रंटलाईन वर्कर्स यांचं लसीकरण करण्यात आलं. मात्र इतर देशातील कोरोनाचं वाढतं संकट पाहता त्यांना मदतीचा हात दिला आणि लस निर्यात केली. त्याचीच प्रचिती म्हणून जगभरातील इतर देश भारताला मदत करत आहेत. कोरोना महामारी देशांच्या सीमेपर्यंत मर्यादीत नाही. त्यामुळे संपूर्ण जगाचं लसीकरण होणं गरजेचं आहे. आपल्या देशात सर्वाधिक लोकसंख्या आहे. देशातील लोकसंख्या पाहत दोन ते तीन महिन्यात संपूर्ण लसीकरण करणं शक्य नाही. देशातील कोरोना लसींची मागणी पाहता आम्ही दिवस रात्र मेहनत करत आहोत, असं पूनावाला आपल्या पत्रकात नमूद केले आहे.

देशात कोरोनाची दुसरी लाट असताना एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशात कोरोनातून बरे होण्याचं प्रमाण 85.6 टक्क्यावर पोहोचलं आहे. गेल्या चोवीस तासात 4 लाख 22 हजार 436 रुग्णांनी कोरोना यशस्वी मात केली. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्याप्रमाणात कोरोना रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या