'भाजप तमिळनाडूचं राजकारण बदलू शकत नाही'

PTI
सोमवार, 28 डिसेंबर 2020

तमिळनाडूतील राजकारण भाजप बदलू शकत नाही आणि मतदारांत फूट पाडू शकत नाही. विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर अण्णाद्रमुक पक्ष भाजपला सत्तेपासून दूरही ठेवू शकते, असा सूर आज अण्णाद्रमुकच्या बैठकीत निघाला.

चेन्नई :  तमिळनाडूतील राजकारण भाजप बदलू शकत नाही आणि मतदारांत फूट पाडू शकत नाही. विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर अण्णाद्रमुक पक्ष भाजपला सत्तेपासून दूरही ठेवू शकते, असा सूर आज अण्णाद्रमुकच्या बैठकीत निघाला. विधानसभा निवडणूक जिंकण्याचा विश्‍वास व्यक्त करण्यात आला. 

भाजप आणि अण्णाद्रमुक यांची आघाडी २०२१ च्या निवडणुकीची तयारी करत असताना आज अण्णाद्रमुकच्या बैठकीत आम्हीच मोठे भाऊ अशा प्रकारचे सूर निघाले. मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून पलानीस्वामी यांच्या नावाला भाजपने पाठिंबा द्यावा तसेच अन्य अटी देखील मान्य कराव्यात, असे पक्ष नेत्यांचे म्हणणे होते. जर भाजपला सरकारमध्ये घ्यायचे नसेल तर अण्णाद्रमुकच्या नेत्यांनी अन्य पर्यायाचा विचार करावा, असे सांगण्यात आले. अण्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा जे. जयललिता आणि द्रमुकचे नेते एम. करुणानिधी यांचे निधन झाल्याने राजकारणात पोकळी निर्माण झाली आहे. 

पलानीस्वामींचा आरोप

दरम्यान, २०१९ ची लोकसभा निवडणूक द्रमुकच्या नेत्यांनी मतदारांना खोटे बोलून जिंकली होती, असा आरोप मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी केला आहे. 

संबंधित बातम्या