मूळगावी नसतानाही आता करता येणार मतदान

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 26 जानेवारी 2021

 देशभरातील नागरिकांना लवकरच  दूरस्थ पद्धतीने मतदान करणे शक्य होणार असून याच्या चाचण्या घेण्यास सुरवात झाल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी सांगितले.

नवी दिल्ली: देशभरातील नागरिकांना लवकरच  दूरस्थ पद्धतीने मतदान करणे शक्य होणार असून याच्या चाचण्या घेण्यास सुरवात झाल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी सांगितले. अकराव्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त प्रसिद्ध केलेल्या निवेदनामध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे. या संदर्भातील यंत्रणेची रंगीत तालीम सुरू झाली असून पहिल्या टप्प्यातील निष्कर्ष सकारात्मक असल्याचेही अरोरा यांनी सांगितले.

लॉकडाउनमध्ये भारतात गरिबी वाढली -

या संदर्भातील तंत्रज्ञान आयआयटी मद्रासकडून विकसित केले जात असून त्याचा प्रत्यक्ष वापर सुरू झाल्यानंतर मतदारांना मतदान करण्यासाठी त्यांच्या मूळ गावी जाण्याची आवश्‍यकता भासणार नाही. यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असल्याचे माजी वरिष्ठ निवडणूक उपायुक्त संदीप सक्सेना यांनी सांगितले होते. नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मतदारासांठी मतदान करण्यासाठीची  पध्दती सुकर होणार आहे. आपल्या गावापासून दूर कामाधंद्यासाठी आलेल्या नागरिकांना मतदानात सहभाग घेता येत नव्हता. मात्र आता  निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे  ही  प्रक्रिया सहज होणार आहे.   

Tractor Parade : दिल्ली सीमेवर अभूतपूर्व गोंधळ; शेतकरी-पोलिसांमध्ये संघर्ष -

संबंधित बातम्या