Corona Vaccine: कोविशील्डच्या पहिल्या डोस नंतर कोवॅक्सिनचा दुसरा डोस घेता येणार का?

दैनिक गोमंतक
बुधवार, 28 एप्रिल 2021

1 मे पासून सर्व प्रौढांना लस देणे सुरू होणार आहे. आशा आहे, यामुळे कोरोनाच्या धोकादायक दुसरी लाट रोखण्यास मदत होईल.

1 मे पासून सर्व प्रौढांना लस देणे सुरू होणार आहे. आशा आहे, यामुळे कोरोनाची धोकादायक दुसरी लाट रोखण्यास मदत होईल. तसेच भारतातील ढासळत्या परिस्थितीलाही दिलासा मिळणार आहे. परंतु असे बरेच प्रश्न आहेत जे लसीकरणाबद्दल पुन्हा पुन्हा विचारले जात आहेत. वेगवेगळ्या तज्ञांनी अनेकदा या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. पण हे प्रश्न 16 जानेवारीपासून भारतात लसीकरण सुरू झाल्यापासून अजूनही विचारले जात आहेत. (Is it possible to take a second dose of Covaxine after the first dose of Covishield?)

हे प्रश्न नक्की काय आहेत आणि त्यांची उत्तरे काय आहेत हे समजून घेऊ?  केंद्र व राज्य सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या गाईडलाईन्स, लस उत्पादक कंपन्यांनी जारी केलेली फॅक्टशीट, लस तज्ज्ञ डॉ. गगनदीप कांग, महामारी तज्ज्ञ डॉ. चंद्रकांत लहरिया, इंदोरचे महात्मा गांधी मेमोरियल मेडिकल कॉलेज औषध विभागाने डॉ व्ही.पी. पांडे यांच्या म्हणण्यानूसार खालिल प्रश्नांचे उत्तर दिले आहेत. वरील प्रत्येकजण म्हणतो की सर्वांनी ही लस घ्यावी. कोरोनाच्या गंभीर लक्षणांपासून आपले संरक्षण करण्यात लस 100 टक्के प्रभावी आहे.

भारतीय पर्यटन उद्योग उद्ध्वस्त! दिल्लीहून न्यूयॉर्कसाठी शेवटचे तिकिट काही लाखात...

तुम्ही 18 वर्षाचे आहेत? डायरेक्ट जाऊन लस घेऊ शकता? 
नाही केंद्र सरकारने यासाठी नोंदणी करणे अनिवार्य केले आहे. 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. याव्यतिरिक्त काही खासगी रुग्णालयांनाही लस दिली जाऊ शकते. परंतु केवळ आरोग्य सेतु अॅपवर किंवा कोव्हिन पोर्टलवर नोंदणी केलेल्यांनाच लस दिली जाईल . ही सुविधा 28  एप्रिलपासून सुरू झाली आहे.

कोणती लस जास्त परिणामकारक 
- कोरोनापासून बचाव करण्यासाठी जगभरात वापरल्या जाणार्‍या सर्व लसींची वेगवेगळी कार्यक्षमता आहे. 66 टक्के ते 95 टक्के  पर्यंत. चांगली गोष्ट म्हणजे ही लस टोचल्यानंतर एखाद्या व्यक्तीला परत संसर्ग झाल्यास तो गंभीर अवस्थेत पोहोचत नाही.
- वेगवेगळ्या वेळी आणि ठिकाणी वैद्यकीय चाचण्या वेगवेगळ्या कार्यक्षमतेसाठी जिम्मेदार ठरवल्या जाऊ शकतात. परंतु चांगली गोष्ट अशी आहे की या सर्व लसी गंभीर लक्षणांपासून संरक्षण करण्यासाठी 100 टक्के प्रभावी आहेत. यामुळे तज्ञ म्हणतात की ज्याला संधी मिळत आहे, त्यांनी लस नक्कीच घ्यायला हवी.

राज्यांसाठी रेल्वेकडून कोविड केअर कोच निर्मिती

पहिला डोस कोविशील्डचा दुसरा कोवॅक्सिनचा काही फरक पडतो?
वेगवेगळ्या कंपन्यांचे डोस घेणे आपल्यासाठी सुरक्षित होणार नाही. आपण कोवॅक्सिनचा प्रथम डोस घेतल्यावर कोवॅक्सिनचाच, दुसरा एक डोस घ्या. त्याचप्रमाणे, कोव्हशील्डचा दुसरा डोस घ्या. महत्वाची गोष्ट म्हणजे याक्षणी लहान मुलांवर लसीच्या चाचण्या झालेल्या नाहीत. यामुळे, त्यांना डोस देणे सुरक्षित होणार नाही.

ही लस कोण घेऊ शकत नाही? 
- आपल्याला कोरोनाच्या पहिल्या डोसची तीव्र अॅलर्जी झाली आहे.
- आपण गर्भवती आहात किंवा आपण स्तनपान करणाऱ्या माता आहात.
- आपल्याला कोरोनाची लक्षणे आहेत.
- आपण इतर कोणत्याही गंभीर आजाराने ग्रस्त असल्यास, डॉक्टरांचा          सल्ला घ्या.

संबंधित बातम्या