पंतप्रधानांची संवेदनशीलता आणि वचनबद्धता दिसते” – अमित शहा

PIB
बुधवार, 1 जुलै 2020

कोणीही उपाशी झोपणार नाही हे सुनिश्चित करणाऱ्या अशा या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.

नवी दिल्ली,

गरिबांना मोफत शिधा पुरविणाऱ्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ दिल्याबद्दल, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले. 

पंतप्रधानांनी देशाला संबोधित केल्यानंतर अमित शहा यांनी आपल्या ट्विटमध्ये, देशातील कष्टकरी शेतकरी आणि प्रामाणिक करदात्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली, ज्यांचे कठोर परिश्रम आणि समर्पण आज या परीक्षेच्या घडीला गरजू लोकांना सहाय्य करत आहे.  

केंद्रीय गृहमंत्री पुढे म्हणाले की, “पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेला दिलेल्या मुदतवाढीतून गरिबांच्या हितासाठी पंतप्रधानांची संवेदनशीलता आणि वचनबद्धता दिसून येते. कोणीही उपाशी झोपणार नाही हे सुनिश्चित करणाऱ्या अशा या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.

संबंधित बातम्या