देशद्रोहाची व्याख्या निश्चित करण्याची वेळ आली- सर्वोच्च न्यायालय

गोमंन्तक वृत्तसेवा
सोमवार, 31 मे 2021

'सरकारवर टीका करणं म्हणजे देशद्रोह ठरत नाही'

आंध्रप्रदेश राज्यातील (Andhra Pradesh) दोन स्थानिक तेलगु वृत्तवाहिन्यांवर खासदाराचं भाषण प्रसारीत केल्याच्या प्रकरणावरुन देशद्रोहाच्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून हा गुन्हा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी दोन्ही वृत्तवाहिन्यांनी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेतली आहे. खासदाराचं भाषण दाखवल्या प्रकरणी दोन्ही वृत्त वाहिन्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणाऱ्या पोलिसांवर सर्वोच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला आहे. 'सरकारवर टीका करणं म्हणजे देशद्रोह ठरत नाही'  सरकारवरील टीका देशद्रोहाच्या व्याख्येत ग्राह्य धरता येणार नाही. देशद्रोहाची व्यख्या निश्चित करण्याची वेळ आली आहे, असं म्हणत सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांना(police) फटकारलं. सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठासमोर या याचिकेवर सुनवाणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने आंध्रप्रदेश सरकार (Government of Andhra Pradesh)आणि पोलिसांच्या कारवाईवर न्यायालयाने आपली नाराजी व्यक्त केली आहे. (It is time to define treason Supreme Court)

भारतातील 'या'' मुख्यमंत्र्यांच्या कामाची 'युनायटेड नेशन्स...

टीव्ही 5 (TV5) आणि एबीएन आंध्रज्योती(ABN Andhrajyoti) या दोन वृत्तवाहिन्यांवर वायएसआर कॉंग्रेसच्या (YSR Congress) खासदाराचं भाषण दाखवल्या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. खासदाराचं भाषण हे देशद्रोहाच्या व्याख्येत मोडत नाही, असं म्हणत या दोन्ही वृत्त वाहिन्यांनी गुन्हा रद्द करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात केली आहे.

भाषण स्वातंत्र्य आणि मिडियाच्या मुद्द्यावर आता भारतीय दंड संहितेच्या कलम 124 अ आणि 153 या नियमांच्या व्याख्या निश्चित करण्याची वेळ आली असल्याचं आम्हाला वाटतं आहे. जर वृत्त वाहिन्या काही म्हणत असतील तर त्याला देशद्रोहाच्या व्याख्येत येत नाही. देशद्रोहाच्या कलमांची व्याख्या निश्चित करण्याची वेळ आली आहे. सरकारवर होत असलेल्या सरकारवर होत असलेल्या टीकेचा समावेश देशद्रोह म्हणून ग्राह्य धरता येणार नाही, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं आहे. तसेच दोन्ही वृत्तवाहिन्यांवर कोणत्याही प्रकारची दंडात्मक कारवाई न करण्याचे निर्देश राज्य सरकार आणि आंध्रप्रदेश पोलिसांना दिले आहेत.  
 

संबंधित बातम्या