वाहन थांबवायला सांगितले म्हणून वाहतूक पोलिसाच्या अंगावरच घातली कार; व्हिडिओ व्हायरल

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020

जबलपूरमधील एका मार्केटमध्ये गर्दीतून एक कार जात होती. कार चालकाने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याने वाहतूक पोलिसाने त्याचे वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु, संबंधित वाहन चालकाने वाहन न थांबवता ते पोलिसांच्या अंगावरच घातले.

जबलपूर- पोलिसांवर मारहाणीचे प्रकार सर्वत्र घडत असताना आता मध्यप्रदेशातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जबलपूरमधील एका वाहतूक पोलिसाच्या अंगावरच कार घातल्याची घटना घडली असून तसा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे. याप्रकरणी संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

जबलपूरमधील एका मार्केटमध्ये गर्दीतून एक कार जात होती. कार चालकाने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याने वाहतूक पोलिसाने त्याचे वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु, संबंधित वाहन चालकाने वाहन न थांबवता ते पोलिसांच्या अंगावरच घातले. गाडीच्या पुढील भागावर वाहतूक पोलिस पडला असतानाही या वाहन चालकाने आपले वाहन न थांबवता तसेच वेगाने पुढे नेले. संबंधित घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सर्वत्र चर्चेला उधाण आले.       

रस्त्यावर चालताना नागरिक वाहतुकीच्या नियमांचे पालन करत नसतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांवर जबाबदारी दिलेली असते. मात्र, पोलिसांना सहकार्य न करता त्यांच्यावरच हल्ले होणाच्या घटना सर्वत्र घडत आहेत.  

संबंधित बातम्या