Jabalpur Railway Station वर हावलदाराने केली वृद्धाला मारहाण; Video Viral

Jabalpur Railway Station Video Viral: जबलपूर रेल्वे स्टेशनवरील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Police
Police Twitter/ANI

Jabalpur Railway Station: जबलपूर रेल्वे स्टेशनवरील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पोलीस कर्मचारी एका वृद्ध व्यक्तीला मारहाण करताना दिसत आहे. हा जवान आरपीएफचा आहे की, जीआरपीचा हे अद्याप समजू शकलेले नाही.

दरम्यान, व्हिडिओमध्ये दिसत आहे की, 'पोलिस कर्मचारी एका वृद्ध व्यक्तीला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत आहे.' ही घटना गुरुवारी घडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यासंबंधीचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होताच हा पोलिस कर्मचारी कोण आहे? वृद्धाला एवढ्या निर्दयीपणे का मारहाण करत आहे? असे विचारले जात आहे.

Police
CBIला दणका! ओमप्रकाश चौटालांच्या याचिकेवर दिल्ली HCने बजावली नोटीस

दुसरीकडे, पोलीस अधीक्षकांच्या म्हणण्यानुसार, जबलपूरमधील रेल्वे स्टेशनवर पोलिस कर्मचारी एका वृद्ध व्यक्तीला मारहाण करत आहे. विशेष म्हणजे, या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाल्यानंतर या पोलीस (Police) हवालदाराला निलंबित करण्यात आले.

शिवाय, हा व्हिडिओ प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या ट्रेनमधील (Train) एका प्रवाशाने शूट केला आहे. त्यावेळी प्रवाशाकडून ही घटना सोशल मीडियावर लाईव्ह दाखवली जात असल्याचे सांगण्यात आले.

Police
Karnataka:'एक हजार मोदी आले तरी...' कुमारस्वामींचा 'योगी मॉडेल' वर हल्लाबोल

तसेच, आरपीएफ आणि जीआरपी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यासंदर्भात स्टेशनवरील विक्रेत्यांशी बोलणे झाले आहे. स्टेशनवर काम करणाऱ्या विक्रेत्यांनीही हा धक्कादायक प्रकार घडल्याचे मान्य केले आहे. मात्र पीडित आणि पोलिस कर्मचाऱ्यांची ओळख पटू शकलेली नाही.

Police
Goa Illegal Bar Row: दिल्ली HCने काँग्रेस नेत्यांना दिले इराणींच्या विरोधातील ट्विट हटवण्याचे आदेश

त्याचबरोबर, व्हिडिओमध्ये दिसत आहे की, 'पोलिस कर्मचारी वृद्धाला बेदम मारहाण करत आहे. विशेष म्हणजे, पोलिस कर्मचारी त्यांना ओढत प्लॅटफॉर्मवर ट्रॅकच्या दिशेने घेऊन जातो.' दुसरीकडे, पोलिस कर्मचाऱ्याच्या या कृत्यावर लोक संताप व्यक्त करत आहेत. अमानुषतेलाही मर्यादा असते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com