कधी गोड तर कधी आंबट; जगदीप धनखड-ममता बॅनर्जींचे राजकीय संबंध ठरले होते देशात चर्चेचा विषय

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी धनखड यांचे फारसे जमले नव्हते. सातत्याने राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार हा वाद पाहायला मिळाला
Mamata Banerjee and Jagdeep Dhankhar Political Relations
Mamata Banerjee and Jagdeep Dhankhar Political RelationsDainik Gomantak

Jagdeep Dhankhar: पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांना (Jagdeep Dhankhar) यांना भाजपप्रणित एनडीएने उपराष्ट्रपतीपदाचे (Vice President Candidate) उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात भाजपचे संख्याबळ असल्याने धनखड यांचे पारडे जड मानले जात आहे. धनखड उपराष्ट्रपती झाल्यास पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सुटकेचा निश्वास सोडतील असे बोलले जावू लागले आहे. (Mamata Banerjee and Jagdeep Dhankhar Political Relations)

धनखड मागील 3 वर्षांपासून पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत. मात्र जगदीप धनखड-ममता बॅनर्जी या दोघांचाही राजकीयदृष्ट्या नेहमीच छत्तीसचा आकडा राहिला आहे. ममता बॅनर्जी यांच्याशी त्यांचे फारसे सख्य जमले नव्हते. सातत्याने राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार हा वाद पाहायला मिळाला होता. दोघांमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवर वादाच्या ठिणग्या पडत होत्या. त्यामुळे पश्चिम बंगालचे राजकारण कायमच देशाच्या पटलावर चर्चेचा विषय ठरले होते.

ममता-धनखड वाद खूप जुना

बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता आणि राज्यपाल (Governor) जगदीप धनखड यांच्यातील वाद नवीन नाही. अनेक मुद्द्यांवरून दोघांमध्ये सातत्याने खटके उडाले होते. ममता राज्यपालांवर थेट केंद्राचे आदेश लादत असल्याचा आरोप करत आल्या आहेत, तर काम करतात ते संविधानानुसार होते असा दावा राज्यपाल धनखड करतात. विधानसभेचे अधिवेशन बोलावणे असो किंवा नवीन आमदाराला शपथ देण्याचा विषय असो, बंगालमध्ये जवळपास प्रत्येक मुद्द्यावर मुख्यमंत्री आणि राज्यपालांमध्ये राजकीय वाद निर्माण व्हायचा. निवडणुकीनंतर राज्यात झालेल्या हिंसाचारावरून मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यात संघर्ष झाला होता.

कधी गोड कधी आंबट तर कधी तिखट

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि आता एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनवलेले राज्यपाल जगदीप धनखड यांच्या नात्यात कधी गोडवा दिसला, तर कधी दोघांचा छत्तीसचा आकडाही दिसला. धनखड यांनी जाहीरपणे कबूल केले होते की त्यांचे आणि ममता बॅनर्जी यांचे भावा-बहिणीचे नाते आहे. मुख्यमंत्री आणि राज्यपाल कसे भांडू शकतात हे त्यांना समजत नव्हते असे ते म्हणायचे.

कधी आणि कसा झाला वाद, जाणून घ्या...

पश्‍चिम बंगाल सरकारने राज्यपाल जगदीप धनखड यांना राज्यातील खासगी विद्यापीठांमध्ये 'अतिथी' किंवा 'विजिटर' म्हणून हटवण्याच्या कायद्यात सुधारणा करून त्यांना त्या पदावरून हटवले होते.

काही दिवसांपूर्वी एका टीव्ही चॅनलच्या कार्यक्रमात जगदीप धनखड यांनी ममता यांच्यावर जोरदार टीका केली होती आणि राज्यात लोकशाहीची परिस्थिती फारशी योग्य नसल्याचे म्हटले होते. 'पश्चिम बंगाल ज्वालामुखीवर बसला आहे आणि अत्यंत नाजूक अवस्थेत आहे. इथे लोकशाही नाही, बंगालची काय अवस्था आहे - श्वास घ्यायचा असेल, नोकरी करायची असेल, राजकारण करायचे असेल, चांगले जीवन जगायचे असेल, तर एकच मार्ग आहे, सत्ताधाऱ्यांसोबत या.'

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काही दिवसांपूर्वी राज्याचे राज्यपाल जगदीप धनखड यांना ट्विटरवर ब्लॉक केले होते. त्या म्हणाल्या की, बंगालच्या राज्यपालांच्या ट्विटमुळे मी नाराज झाले, त्यानंतर त्यांनी धनखड यांना ब्लॉक केले. यादरम्यान ममता बॅनर्जी यांनी राज्यपाल धनखड यांच्यावरही गंभीर आरोप केले होते.

पश्चिम बंगालमध्ये राज्यपाल जगदीप धनखड आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यातील संघर्षाच्या दरम्यान, राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून चर्चेचे निमंत्रण दिले होते आणि त्यांना सोयीनुसार राजभवनात आमंत्रित केले होते. परस्पर संबंध सुधारण्याचा हा प्रयत्न मानला जात होता आणि दोघेही बोलत होते.

Mamata Banerjee and Jagdeep Dhankhar Political Relations
जनता दल, काँग्रेस, भाजप ते पश्चिम बंगालचे राज्यपाल : जगदीप धनखड यांचा संपूर्ण राजकीय प्रवास

धनखड यांनी ममता बॅनर्जी यांचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे, ज्यामध्ये ते सार्वजनिकपणे एका पोलिस अधिकाऱ्याला राज्यपालांनी तुम्हाला बोलावून त्यांच्या कामात हस्तक्षेप केला का, असे विचारत आहेत. ममता यांना लक्ष्य करत धनखड यांनी ट्विट केले होते की, ही चिंताजनक परिस्थिती आहे. ममता बॅनर्जी एका एसपीला जाहीरपणे राज्यपालांनी तुम्हाला बोलावले आहे का, असे विचारत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com