केंद्रीय विद्यापीठांत ‘जामिया मिलीया’ अव्वल

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020

अलीकडच्या काळात जामिया विद्यापीठाला ज्या आव्हानात्मक काळातून जावे लागले त्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय मानांकनात अव्वल स्थान मिळणे विद्यापीठासाठी अत्यंत समाधानाची बाब आहे. दर्जेदार शिक्षणाची दीर्घ परंपरा यापुढेही चालूच ठेवू. - नजमा अख्तर, कुलगुरू, जामिया मिलीया इस्लामिया विद्यापीठ, दिल्ली

नवी दिल्ली: केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या केंद्रीय विद्यापीठांच्या २०२० च्या गुणवत्ता मानांकनात दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाने अव्वल क्रमांक पटकावला आहे. गुणवत्ता व विद्यार्थी सुविधांसह काही ठळक निकषांवर दरवर्षी ४० केंद्रीय विद्यापीठांना हे मानांकन देण्यात येते. 

या विद्यापीठांची बाजी

  •    जामिया मिलीया इस्लामिया विद्यापीठ, दिल्ली
  •     राजीव गांधी विद्यापीठ, 

अरुणाचल प्रदेश

  •     जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्ली 
  •     अलिगड मुस्लिम विद्यापीठ, अलिगड

संबंधित बातम्या