काश्‍मीरच्या उद्योगासाठी १३५० कोटींचे पॅकेज

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 20 सप्टेंबर 2020

कोरोना संसर्गामुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या जम्मू काश्‍मीरच्या उद्योग व्यवसायाला रुळावर आणण्यासाठी आणि राज्यातील आर्थिक घडामोडींना चालना देण्यासाठी केंद्र सरकारने विशेष आथिॅक पॅकेज मंजूर केले आहे. यानुसार नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी जम्मू-काश्‍मीरसाठी १३५० कोटींच्या पॅकेजची घोषणा केली.

श्रीनगर: कोरोना संसर्गामुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या जम्मू काश्‍मीरच्या उद्योग व्यवसायाला रुळावर आणण्यासाठी आणि राज्यातील आर्थिक घडामोडींना चालना देण्यासाठी केंद्र सरकारने विशेष आथिॅक पॅकेज मंजूर केले आहे. यानुसार नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी जम्मू-काश्‍मीरसाठी १३५० कोटींच्या पॅकेजची घोषणा केली. या पॅकेजच्या माध्यमातून काश्‍मीर खोऱ्यात रोजगार निर्मिती आणि उद्योगाला प्रोत्साहन मिळेल, अशी अपेक्षा सिन्हा यांनी व्यक्त केली. 
या पॅकेजनुसार काश्‍मीर खोऱ्यातील नागरिकांना वर्षभरासाठी वीज आणि पाण्यावरील करात ५० टकक्यांपर्यंत सवलत मिळणार आहे. याशिवाय आगामी काळात वाहतूकदार, वाहनचालक, ऑटो चालक, हाउसबोट मालक आणि शिकारावाल्यांसाठी विशेष पॅकेजचा विचार केला जात असल्याचे सिन्हा म्हणाले.

राजभवन येथील पत्रकार परिषदेत नायब राज्यपाल सिन्हा यांनी आर्थिक पॅकेजची माहिती दिली. काश्‍मीर खोऱ्यातील लहान-मोठे उद्योगांच्या पुनरुज्जीवनासाठी १३५० कोटींचे पॅकेज जाहीर केल्याचे ते म्हणाले. 

आत्मनिर्भर भारत अभियानाव्यतिरिक्त काश्‍मीरसाठी अनेक प्रशासकीय निर्णय घेतले असून आगामी काळात या निर्णयाचा लाभ होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
 
काश्‍मीर खोऱ्यातील अडचणी सोडवण्यासाठी स्थानिक जनतेचा सहभाग आणि पाठिंबा असणे गरजेचे आहे, असे सिन्हा म्हणाले.

 राज्यात विविध क्षेत्रतील ३५ शिष्टमंडळांनी ऑगस्ट महिन्यात आपली भेट घेतली आणि त्यांनी समस्या मांडल्या.

संबंधित बातम्या