jammu kashmir: जम्मू-काश्मीरच्या सुरक्षा दलाचा पराक्रम; दहशतवाद्यांच्या तीन मदतनीसांना अटक

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 17 फेब्रुवारी 2021

जम्मू-काश्मीरच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाला यश प्राप्त झाले आहे. दहशतवाद्यांच्या तीन मदतनीसांकडून आयईडी बनविण्याचे साहित्य जप्त केले आहे.

जम्मू-काश्मीर: जम्मू-काश्मीरच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाला यश प्राप्त झाले आहे. दहशतवाद्यांच्या तीन मदतनीसांकडून आयईडी बनविण्याचे साहित्य जप्त केले आहे. अटक करण्यात आलेल्या अतिरेक्यांचे मदतनीस हिजबुलसाठी कार्यरत होते.

गुप्तचरांच्या मदतीने मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवाई करणायत ली आहे. अवंतीपोरा पोलिस, सैन्याच्या 42 आरआर आणि सीआरपीएफच्या 180 व्या बटालियनने त्रालमधील दोन ठिकाणी शोध मोहीम सुरू केली आहे. या दरम्यान, हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या तीन साथीदारांना अटक करण्यात यश आले आहे.

अटक करण्यात आलेल्या अतिरेक्यांचे मदतनीस त्राल आमि अवंतीपोरा भागातील हिज्बुल अतिरेक्यांना शस्त्रे, दारूगोळा, रसद पुरवित असतांना आढळून आले आहे. तसेच चौकशीदरम्यान डडसरा गावात एका घरातून आयईडी बनविण्याचे साहित्य जप्त केले आहे. 

ज्यातून आठ इलेक्ट्रिक डिटोनेटर, सात अँटी मॅकेनिझम स्विचेस, तीन रिले स्विच आणि अँटी-माइन वायरलेस एंटीना सापडला आहे. पकडल्या गेलेल्या अतिरेकी मदतगारांची नावे सफत अहमद सोफी, मजीद मोहम्मद भट आणि ओमर रशीद वानी अशी आहेत. पोलिसांनी संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. चौकशीत या घटनेबाबत मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.

 

 

संबंधित बातम्या