Jammu Kashmirमध्ये दोन दहशतवाद्यांना शस्त्रांसह अटक; सुरक्षा दलांना मोठे यश

Lashkar-e-Taiba Terrorist Arrested: जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोरमध्ये शनिवारी सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे.
Lashkar-e-Taiba Terrorist Arrested
Lashkar-e-Taiba Terrorist ArrestedTwitter

जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यामधील सोपोरमध्ये शनिवारी सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तैयबाच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 2 पिस्तूल, 2 पिस्तुल मॅगझिन आणि 11 काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. अटक करण्यात आलेल्या दोन्ही दहशतवाद्यांची नावे तारिक अहमद वानी मुलगा दिवंगत बशीर अहमद वानी आणि इश्फाक अहमद वानी मुलगा अली मोहम्मद अशी आहेत. दोघेही रंगरेथ, ओल्ड एअरफील्ड, श्रीनगर येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.

विशेष माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी डांगीवाचा पोलिस स्टेशनच्या हडीपोरा-रफियााबादमध्ये नाकाबंदी केली होती. नाका पॉईंट येथे तपासणी सुरू असताना, सुरक्षा दलांना पाहताच लोरीहामा लिंक रोडवरून हडीपोराकडे येत असलेल्या दोन संशयित व्यक्तींनी रस्त्यावरून पळ काढल्याचे समजले.

या कारवाईमध्ये सोपोर पोलीस, राष्ट्रीय रायफल आणि सीआरपीएफच्या जवानांनी दोन्ही संशयितांचा पाठलाग करून त्यांना जिवंत पकडले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून 2 पिस्तुल, 2 पिस्तुल मॅगझिनसह 11 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.

* लष्कर-ए-तैयबाचे हायब्रीड दहशतवादी

अटक करण्यात आलेले आरोपी लष्कर-ए-तैयबा या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचे हायब्रीड दहशतवादी आहे अशी प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे. ते सतत सुरक्षा दल आणि नागरिकांवर हल्ले करण्याच्या संधीच्या शोधात होते. दोन्ही दहशतवाद्यांविरोधात रफियााबादच्या डांगीवाचा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com