जम्मू -काश्मिरात दोन ठिकाणी लष्कराची कारवाई, एक दहशतवादी ठार
Jammu-Kashmir: Encounter at Bandipora & Anantnag sector Dainik Gomantak

जम्मू -काश्मिरात दोन ठिकाणी लष्कराची कारवाई, एक दहशतवादी ठार

बांदीपोरामध्येच जम्मू-काश्मीर (Jammu-Kashmir) पोलिसांनी लष्कर-ए-तय्यबाची शाखा 'द रेझिस्टन्स फ्रंट' चा भंडाफोड केला आहे.

जम्मू -काश्मीरमध्ये (Jammu-Kashmir) आज सकाळी उत्तर काश्मीरच्या बांदीपोरा (Bandipora)जिल्ह्यातील हाजीन भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये (Terrorists) चकमक सुरू झाली आहे . या चकमकीबाबत काश्मीर झोन पोलिसांनी सांगितले की, बंडीपोराच्या गुंड जहांगीर भागात चकमक सुरू झाली असून पोलीस आणि सुरक्षा दल दोघेही घटनास्थळी तैनात आहेत. (Jammu-Kashmir: Encounter at Bandipora & Anantnag sector)

तसेच बांदीपोरामध्येच जम्मू-काश्मीर पोलिसांनी लष्कर-ए-तय्यबाची शाखा 'द रेझिस्टन्स फ्रंट' चा भंडाफोड केला आहे. मोहम्मद शफी लोन या नागरिकाच्या हत्येच्या कटात सहभागी असलेल्या चार दहशतवादी साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे.

तर दुसरीकडे जम्मू -काश्मीरच्या अनंतनागमध्येदेखील सोमवारी सकाळी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे . ही चकमक खगुंड वेरीनाग परिसरात झाली असून हे ऑपरेशन सुरूच आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी एक पिस्तूल आणि एक ग्रेनेड देखील जप्त केले आहे. बांदीपोराच्या गुंडजहागीर परिसरात दहशतवाद्यांशी चकमक झाली आहे. जम्मू -काश्मीर पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ही कारवाई पोलीस आणि सुपर फोर्स संयुक्तपणे करत आहेत. तेथे आणखीन एक ते दोन दहशतवादी असल्याची माहिती देखील मिळत आहे.

दरम्यान काल राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) रविवारी जम्मू -काश्मीरमध्ये छापेमारी दरम्यान द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) च्या दोन सदस्यांना अटक केली होती . त्यांची नावे तौसिफ अहमद वानी रहिवासी बारामुल्ला आणि फैज अहमद खान निवासी अनंतनाग अशी देण्यात आली आहेत.आतापर्यंतच्या चौकशी दरम्यान, लष्कर-ए-तय्यबा आणि टीआरएफच्या नवीन षड्यंत्राचा भंडाफोड करण्यात आला आहे. एनआयएच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या पाकिस्तानी हस्तकाच्या सांगण्यावरून हे लोक लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेसोबत मोठ्या घातपाताची योजना आखत होते. त्यांचा उद्देश स्थानिक लोकांमध्ये भीती पसरवणे होता. काल टाकलेल्या छाप्यात अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे, पेन ड्राईव्ह इत्यादी जप्त करण्यात आल्या आहेत

Jammu-Kashmir: Encounter at Bandipora & Anantnag sector
Corona Vaccine: 'स्वखर्चाने लस घेतलीय, पंतप्रधांनाचा फोटो'

Related Stories

No stories found.