जम्मू-काश्मीरात पुन्हा तणाव, मेहबुबा मुफ्ती नजरकैदेत

मेहबुबा मुफ्ती यांनी काल त्यांच्या जम्मू कार्यालयात एका सभेला संबोधित केले होते. तेथेही त्यांनी आपला निषेध व्यक्त केला.
जम्मू-काश्मीरात पुन्हा तणाव, मेहबुबा मुफ्ती नजरकैदेत
Jammu Kashmir: PDP Chief Mehbooba Mufti under house arrest Dainik Gomantak

जम्मू-काश्मीरच्या (Jammu Kashmir) माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी प्रमुख (PDP Chief) मेहबुबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांना पुढील आदेशापर्यंत नजरकैदेत (House Arrest) ठेवण्यात आले आहे. जम्मू खोऱ्यात वाढत्या दहशतवादी घटना आणि सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात सतत होणाऱ्या चकमकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला आहे. मेहबुबा मुफ्ती यांनी नुकताच केंद्रावर मोठा आरोप केला होता आणि त्या आरोपांनंतर आता हा निर्णय घेण्यात आला आहे. (Jammu Kashmir: PDP Chief Mehbooba Mufti under house arrest)

सोमवारी झालेल्या चकमकीत अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्यावर मेहबुबा मुफ्ती यांनी , खोऱ्यात दहशतवादी मारले जात आहेत की नाही, हे कोणालाही माहिती नाही तर याच सोमवारी झालेल्या चकमकीत तीन नागरिक ठार झाल्याचा दावा त्यांनी केला होता.जम्मू काश्मीर खोऱ्यात दहशतवादाच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य केले जात असल्याचेही त्यांनी म्हटले होते. याआधीही खोऱ्यात सुरक्षा दलांची संख्या वाढवण्यात आल्यावर मुफ्तींनी त्याचा निषेध केला होता. लष्कराची उपस्थिती वाढवून सरकार जम्मू-काश्मीरला छावणीत रूपांतरित करू इच्छित आहे.असा आरोप त्यांनी सरकारवर केला होता . त्यांच्या या वक्तव्यावर सरकारने देखील कठोर भूमिका घेतली होती.

मेहबुबा मुफ्ती यांनी काल त्यांच्या जम्मू कार्यालयात एका सभेला संबोधित केले होते. तेथेही त्यांनी आपला निषेध व्यक्त केला. त्यांच्या कार्यक्रमादरम्यान कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली काश्मिरींची हत्या थांबवा. खुद्द मेहबुबाही या घोषणांचे समर्थन करत होत्या आणि केंद्रावर अनेक गंभीर आरोप करत होत्या.

Jammu Kashmir: PDP Chief Mehbooba Mufti under house arrest
जम्मू काश्मिरात CRPF च्या तुकडीवर हल्ला, दोन जवान जखमी

यापूर्वी, T20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानच्या विजयाचा आनंद साजरा करणाऱ्या काश्मिरींना पाठिंबा दिल्याने त्याही वेळेस मेहबुबा मुफ्ती मोठ्या वादात सापडल्या होत्या . त्यानंतर मुफ्ती यांनी एक ट्विट करत लोकांना विराट कोहलीकडून शिकण्याचा सल्ला दिला होता. पाकिस्तानच्या विजयाचा जल्लोष केला जातो, तर एवढा रोष कशाला, या देशात इतर अनेक प्रकारच्या घोषणा दिल्या जातात. त्यांच्या याच वक्तव्याचा निषेध करत भाजपने मोठा गदारोळ केला होता.

आणि आता याच वादग्रस्त वक्तव्यांदरम्यान ही कारवाई करण्यात आली असून जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनीही मोठा संदेश दिला आहे. एका कार्यक्रमात मनोज सिन्हा म्हणाले आहेत की, काही लोक खोऱ्यातील वातावरण बिघडवण्याचे काम करतात. येत्या दोन वर्षांत खोऱ्याला दहशतमुक्त करू, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली होती. तर दुसरीकडे मेहबुबा यांच्यावरील कारवाईनंतर त्यांचा पीडीपी पक्ष देखील स्वस्थ बसणार नसल्याचे वृत्त आहे. पीडीपी आज त्यांच्या पक्ष कार्यालयावर आंदोलन करणार आहे. खोर्‍यातील हत्यांसोबतच हा मुद्दा देखील नक्कीच काढला जाईल, तसेच या सगळ्याशिवाय आज सकाळी 11.30 वाजता फारुख अब्दुल्ला यांच्या घरी गुपकर संघटनांची एक महत्त्वाची बैठक होणार आहे.

पण जम्मू काश्मीर पोलिसांकडून रात्री उशिरा मेहबुबा मुफ्ती नजरकैदेत नसल्याचे सांगण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com