काश्‍मीर खोऱ्यातील हिमवृष्टीमुळे जम्मू-श्रीनगर महामार्ग बंद

PTI
रविवार, 13 डिसेंबर 2020

दृष्यमानता कमी झालेली असताना अनेक ठिकाणी दरडी कोसळल्यामुळे वाहतूक थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. तापमानात कमालीची घसरण झाली असून काश्‍मीर खोरे गारठून गेले आहे.

श्रीनगर : गेल्या दोन - तीन दिवसांपासून काश्‍मीर खोऱ्यात सतत होणाऱ्या हिमवृष्टीमुळे २७० किलोमीटरचा जम्मू-श्रीनगर महामार्ग बंद करण्यात आला. दृष्यमानता कमी झालेली असताना अनेक ठिकाणी दरडी कोसळल्यामुळे वाहतूक थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. तापमानात कमालीची घसरण झाली असून काश्‍मीर खोरे गारठून गेले आहे. काश्‍मीर खोऱ्यात शुक्रवारपासून हिमवृष्टी होईल, असा इशारा वेधशाळेने अगोदरच दिला होता. 

जम्मूसह परिसरातील जिल्हे कथुआ, सांबा, उधमपूर, डोडा, किश्‍तवाड, रामबन, पूंच, राजौरी येथे मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टी झाली. पावसामुळे आणि बर्फवृष्टीमुळे श्रीनगर महामार्गावरील जवाहर बोगद्याजवळ सुमारे दीड फूट बर्फ साचला आहे. परिणामी महामार्गावरची वाहतूक थांबवावी लागली. रामबन येथे अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटनामुळे वाहतूक सुरू करताना अडचणी आल्या. महामार्गावर प्रवासी आणि वाहने अडकून पडले आहेत. जम्मूत काल रात्रभर पाऊस पडला, मात्र आज सकाळी सूर्यदर्शन झाले. वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, जम्मू काश्‍मीरच्या हवामानात लवकरच सुधारणा होईल. 

 

 

अधिक वाचा :

शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याने झालेल्या चकमकीत पाकिस्तानचे पाच सैनिक ठार

‘भारत-उझबेकिस्तान दहशतवादाविरुद्ध एकत्र

 

संबंधित बातम्या