Bhupendra Singh Chaudhary: जाट नेते भूपेंद्र चौधरी बनले यूपी भाजपचे नवे अध्यक्ष

Bhupendra Singh Chaudhary: उत्तर प्रदेश भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षाची प्रतीक्षा संपली आहे.
Bhupendra Singh Chaudhary
Bhupendra Singh ChaudharyDainik Gomantak

Bhupendra Singh Chaudhary: उत्तर प्रदेश भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षाची प्रतीक्षा संपली आहे. भाजप अध्यक्षपदाच्या शर्यतीत जाट नेते भूपेंद्र सिंह चौधरी विजयी झाले आहेत. भूपेंद्र सिंह चौधरी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. भूपेंद्रसिंग चौधरी यांची जाट समुदाय आणि पश्चिमी उत्तर प्रदेशात मजबूत पकड आहे.

दरम्यान, विजयी झाल्यानंतर योगी-2.0 मध्ये भूपेंद्र चौधरी यांना योगी सरकारमध्ये दुसऱ्यांदा मंत्री करण्यात आले होते. याआधी त्यांनी दीर्घकाळ पक्ष पातळीवर काम केले आहे. बुधवारी दुपारी भूपेंद्र चौधरी (Bhupendra Singh Chaudhary) नवे अध्यक्ष होणार असल्याची चर्चा सुरु झाली होती, तेव्हा ते अचानक आझमगडमधील कार्यक्रम सोडून लखनौला (Lucknow) रवाना झाले.

Bhupendra Singh Chaudhary
Uttar Pradesh: यूपी पोलिसांचा क्रूर चेहरा आला समोर, इन्स्पेक्टरने महिलेला दिली थर्ड डिग्री

जाट समुदयावर मजबूत पकड

पश्चिम उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कांठ विधानसभा जागा जाट लॅंड म्हणूनही ओळखली जाते. भूपेंद्र चौधरी हे या जाट हार्ट लॅंडमधून येतात. योगींच्या मागील सरकारमध्ये भूपेंद्र चौधरी यांनाही मंत्री करण्यात आले होते. त्यावेळी भूपेंद्र चौधरी हे पंचायत राज्यमंत्री होते. चौधरी यांनी 1999 मध्ये सपा संस्थापक मुलायम सिंह यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवली होती. लोकसभा निवडणुकीतील (Election) पराभवानंतरही भाजपने भूपेंद्र चौधरी यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवला होता. त्याचा परिणामही दिसून येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com