‘’जवाहरलाल नेहरु इंचार्ज नाहीत, नरेंद्र मोदी आहेत’’

Jawaharlal Nehru is not in charge Narendra Modi is
Jawaharlal Nehru is not in charge Narendra Modi is

नवी दिल्ली: देशात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकादा मोठ्याप्रमाणात वाढू लागला आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेवरुन कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी  (Priyanka Gandhi ) यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्र सरकारच्या लसीकरण धोरणावरही त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. मोदी सरकार दुसऱ्या कोणावरही जबाबदारी टाकू शकत नाही. अशा शब्दांत त्यांनी माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत सुनावलं आहे. देश संकटात असताना केंद्र सरकार इतर कोणावर जबाबदारी देऊन आपले अंग काढून घेऊ शकत नाही, असंही त्या म्हणाल्या आहेत.

‘’केंद्र सरकार इतर कोणावर आरोप कदापि करु शकत नाही. जवाहरलाल नेहरु या सगळ्याचे इंचार्ज नाहीत, तर ते मोदी (Narendra Modi) आहेत. पंतप्रधानांनी देशातील प्रत्येक नागरिकांचं रक्षण केलं पाहिजे,’’ असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे.

राजकारणामुळे विरोधकांच्या महत्त्वाच्या सूचनांकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करत आहे. देश संकटात असताना या सूचनांचा स्वीकार करायला हवा होता, असं मत प्रियंका गांधी यांनी व्यक्त केलं आहे. मोदी सरकारकडे कोणत्याही प्रकारची दुरदृष्टी नसल्याने भारत लस आयातदार बनला आहे. लसीकरण धोरण हे भेदभाव करणारं आहे, अशी टीकाही यावेळी त्यांनी केली.

दरम्यान, पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, ‘’कोरोना महामारीमध्ये लोकांचा जीव वाचवण्यासाठी जे मुद्दे उचलण्याची गरज आहे ते सर्व मुद्दे कॉंग्रेस उचलते मात्र त्यासाठी केंद्र सरकर त्यांच्यावर कोणताही ठपका ठेवत आहे.’’
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com